Lokmat Sakhi >Food > टिपिकल आंध्रप्रदेशस्टाईल इडली खायची? इडलीवर 'हा' मसाला टाका, गरमागरम भातासोबतही लागतो चवदार

टिपिकल आंध्रप्रदेशस्टाईल इडली खायची? इडलीवर 'हा' मसाला टाका, गरमागरम भातासोबतही लागतो चवदार

Andha Pradesh Style Karampodi Masala Recipe: इडली, डोसा, भात यासोबत खाण्यासाठी आंध्र प्रदेशचा प्रसिद्ध करमपोडी मसाला एकदा ट्राय करून पाहा..(how to make karampodi masala?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2024 06:49 PM2024-09-07T18:49:40+5:302024-09-07T18:50:27+5:30

Andha Pradesh Style Karampodi Masala Recipe: इडली, डोसा, भात यासोबत खाण्यासाठी आंध्र प्रदेशचा प्रसिद्ध करमपोडी मसाला एकदा ट्राय करून पाहा..(how to make karampodi masala?)

Andha pradesh style karampodi masala, how to make karampodi masala | टिपिकल आंध्रप्रदेशस्टाईल इडली खायची? इडलीवर 'हा' मसाला टाका, गरमागरम भातासोबतही लागतो चवदार

टिपिकल आंध्रप्रदेशस्टाईल इडली खायची? इडलीवर 'हा' मसाला टाका, गरमागरम भातासोबतही लागतो चवदार

Highlightsसाजूक तूप टाकलेल्या गरम भातासोबत खायलाही हा मसाला अतिशय उत्तम लागतो. कधीतरी चवीमध्ये बदल म्हणून तुम्ही तो वरणातही टाकू शकता.

आपण आपल्या पद्धतीने इडली, सांबार, डोसा, उत्तप्पा, अप्पे असे बरेच दाक्षिणात्य पदार्थ करतो. पण दक्षिणेत त्या पदार्थांना जी खास चव असते ती काही आपल्याला जमत नाही.. म्हणूनच आता हा दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये प्रसिद्ध असणारा आणि मुळचा आंध्रप्रदेशचा असणारा करमपोडी मसाला तयार करून पाहा.. (Andha Pradesh Style Karampodi Masala Recipe) हा मसाला तुम्ही इडली, उतप्पा, डोसा या पदार्थांवर भुरभुरून खाऊ शकता किंवा मग साजूक तूप टाकलेल्या गरम भातासोबत खायलाही हा मसाला अतिशय उत्तम लागतो. कधीतरी चवीमध्ये बदल म्हणून तुम्ही तो वरणातही टाकू शकता.(how to make karampodi masala?)

आंध्रप्रदेशचा करमपोडी मसाला करण्याची रेसिपी

 

साहित्य

१० ते १५ बेगडी किंवा काश्मिरी लाल मिरची 

४ ते ५ लसूण पाकळ्या

२ टेबलस्पून उडीद डाळ

दारासमोर काढा गौरीची नाजूक- सुंदर पाऊलं! बघा झटपट होणाऱ्या सोप्या रांगोळी डिझाईन्स

२ टेबलस्पून चना डाळ

चवीनुसार मीठ 

२ टीस्पून तेल

७ ते ८ कडिपत्त्याची पाने, 

१ टेबलस्पून शेंगदाणे

अर्धा टीस्पून मसूर डाळ

 

कृती

सगळ्यात आधी तर गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये थोडं तेल टाका.

तेल गरम झाल्यानंतर लाल मिरची टाकून परतून घ्या आणि त्यानंतर कढईबाहेर काढा.

चहा प्यायल्यामुळे ॲसिडीटी होते? चहा घेण्याआधी 'हा' उपाय करा, अजिबात त्रास होणार नाही

त्यानंतर गरज वाटल्यास कढईमध्ये आणखी थोडं तेल टाका आणि लसूण, उडीद डाळ, हरबरा डाळ, मसूर डाळ टाकून परतून घ्या.

परतून झालेले सगळे पदार्थ थंड होऊ द्या आणि नंतर मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर करून घ्या. 

त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका आणि हा मसाला एअरटाईट डब्यात घालून ठेवा. १ ते दिड महिना तरी या मसाल्याला काही होत नाही. 

 

Web Title: Andha pradesh style karampodi masala, how to make karampodi masala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.