मंगळवारी संकष्ट चतुर्थी आली की, त्यावेळी अंगारक योग येतो. अंगारकी चतुर्थी (Angarki chaturthi 2021) आज अनेक महिन्यांनी आली आहे. अंगारकीला अनेक घरांमध्ये उपवास केले जातात. संकष्टी म्हटलं की गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य मोदक. मोदक खायला सगळ्यांनाच आवडतात पण मोदक बनवणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. कधी उकड व्यवस्थित होत नाही तर कधी मोदक फाटतात. त्यामुळे वेळही वाया जातो आणि मनासारखे मोदकही मिळत नाहीत. (Perfect Modak recipe) म्हणूनच आम्ही तुम्हाला How To Make Ukadiche Modak मोदकांची रेसेपी आणि चांगल्या मोदकांच्या टिप्स सांगणार आहोत.
१) मऊ, पांढऱ्याशुभ्र मोदकांसाठी टिप्स
मोदकांसाठी नेहमी ऊकड काढताना पाण्यात थोडंस तूप घालावं. मोदकांच्या पीठात थोडंस मीठ घालू शकता. मोदकाला आकार देताना नेहमी ५ किंवा ७ विषम संख्येत दुमडून आकार द्यावा.
२) सुबक, मऊ मोदकांसाठी उकड
३) उकडीच्या मोदकांची रेसेपी
साहित्य
स्वच्छ धुवून सुकवलेले तांदळाची पीठी
एक वाटी साखर किंवा गूळ
एक नारळ
दोन चमचे तूप
वेलची पूड.
कृती
सारणासाठी कढईत थोडं तूप घालून खोवलेल्या नारळात साखर किंवा गूळ घालून मंद आचेवर शिजत ठेवा. शिजत असताना मधून मधून हलवत राहा आणि भांड्याच्या तळाला सारण चिकटू देऊ नका. शिजत आल्यावर त्यात खसखस, वेलची पूड घालावी. हालवून सारण एकजीव करावे. पुन्हा थोडे शिजवून आचेवरून उतरवावे. आवरणासाठी जितकं तांदळाचं पिठ, तितकंच पाणी उकळून घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ, दोन चमचे तूप आणि अर्धा चमचा तेल घालावे. पाणी उकळल्यावर खाली घेऊन त्यात पिठ घालून हालवावे.
झाकण ठेवून मंद गॅसवर दोन वाफा काढाव्या. आचेवरून खाली उतरवून ही उकड गरम असतानाच एखाद्या भांड्याच्या मदतीने मळावी. हाताने मळण्यासारखं झाल्यानंतर तेलपाण्याचा हात लावत मोदक घडवता येईल इतपत मऊसर ठेवावे.
या उकडीच्या पीठाचे गोळे करून हातानं पारी बनवावी. वाटीचा आकार देऊन त्यात सारण भरावे आणि पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद कराव्या व टोक काढावे. मोदकाच्या कळ्या नेहमी विषम संख्येत म्हणजे तीन, पाच, अशा पाडाव्यात.
हे तयार केलेले मोदक एका चाळणीत स्वच्छ पांढरे कापड घालून किंवा केळीच्या पानावर थोडं तुप लावून उकडायला ठेवावे आणि गरम असतानाच त्यावर साजूक तूप घालून खायला द्यावे. ही पद्धत वापरल्यानं बाप्पाला आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना आवडणारे मोदक मस्त सुबक आणि रेखीव होतील. अत्यंत कमीतकमी वेळात तुम्ही बाप्पाला नैवेदय दाखवू शकता.