Lokmat Sakhi >Food > सेलीब्रिटी न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी सांगतात हेल्दी मुसळी, पाहा सोपी रेसिपी- खा पौष्टिक आणि स्वस्त...

सेलीब्रिटी न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी सांगतात हेल्दी मुसळी, पाहा सोपी रेसिपी- खा पौष्टिक आणि स्वस्त...

Anjali Mukerjee Share's Easy Muesli Recipe : How To make Muesli At Home : सेलीब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन अंजली मुखर्जी यांनी हेल्दी मुसळी घरी तयार करण्याची सोपी रेसिपी शेअर केली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2024 06:31 PM2024-10-31T18:31:30+5:302024-10-31T18:42:28+5:30

Anjali Mukerjee Share's Easy Muesli Recipe : How To make Muesli At Home : सेलीब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन अंजली मुखर्जी यांनी हेल्दी मुसळी घरी तयार करण्याची सोपी रेसिपी शेअर केली...

Anjali Mukerjee Share's Easy Muesli Recipe How To make Muesli At Home | सेलीब्रिटी न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी सांगतात हेल्दी मुसळी, पाहा सोपी रेसिपी- खा पौष्टिक आणि स्वस्त...

सेलीब्रिटी न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी सांगतात हेल्दी मुसळी, पाहा सोपी रेसिपी- खा पौष्टिक आणि स्वस्त...

आजकाल हेल्थ कॉन्शियस किंवा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणारे अनेकजण मुसळी खातात. सकाळचा नाश्ता, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण, संध्याकाळच्या स्नॅकसाठी तुम्हाला खाता येईल असा पदार्थ म्हणून मुसळी फारच लोकप्रिय आहे. मुसळी हा रेडी टू इट असा एक लोकप्रिय नाश्त्याचा पर्याय आहे. यामध्ये ओट्स, फळ, ड्रायफ्रुट्स आणि इतर गोष्टींचा समावेश असतो. दिवसभरातील सकाळचा नाश्ता सर्वात महत्वाचा असतो. म्हणूनच नाश्त्यासाठी मुसळी हा उत्तम पर्याय आहे. आपल्या दिवसाची किक-स्टार्ट सुरुवात करण्यासाठी प्रोटीन आणि फायबरयुक्त मुसळी आवर्जून खाण्याचा सल्ला अनेक डाएटिशियन आणि फिटनेस ट्रेनर देतात. मुसळी बनवतांना त्यात फक्त दूध घालायचे असल्यामुळे घाईच्यावेळी हा पटकन तयार होणारा असा नाश्ता आहे(How To make Muesli At Home).

मुसळी सकाळच्या ब्रेफाकफास्टमध्ये खायची म्हटल्यावर आपण एकदम एकाच वेळी त्याचे मोठे पाकीट विकत घेतो. परंतु या बाहेर विकत मिळणाऱ्या मुसळी फारच महाग असतात. याचबरोबर त्या रोजच्या नाश्त्यासाठी खाल्ल्या की आठवडाभरातच खाऊन संपतात. अशा परिस्थितीत काहीवेळा अशा महागामोलाच्या मुसळीचे पाकीट आणणे परवडत नाही. त्याचबरोबर या बाहेरुन विकत आणलेल्या मुसळीमध्ये अनेक प्रकारचे आर्टिफिशियल रंग, प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात, जे आपल्या शरीराला हानिकारक असतात. यासाठीच सेलीब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन अंजली मुखर्जी (Anjali Mukerjee) यांनी घरच्या घरी मुसळी कशी तयार करताना येईल याची सिक्रेट रेसिपी सांगितली आहे(Anjali Mukerjee Share's Easy Muesli Recipe).

साहित्य :- 

१. खोबरेल तेल - १ टेबलस्पून 
२. ओट्स - १ कप
३. पोहे - १ कप 
४. बदाम - १/२ कप (बारीक तुकडे केलेले)
५. अक्रोड - १/२ कप (बारीक तुकडे केलेले)
६. अळशी - १/२ टेबलस्पून 
७. भोपळ्याच्या बिया - १/२ टेबलस्पून
८. मध - १ टेबलस्पून 
९. कॉर्नफ्लेक्स - १ कप 
१०. ड्राय बेरीज - १/२ कप 

फराळात विकतसारख्या आलू भुजिया करण्याची झटपट सोपी रेसिपी, कुरकुरीत-चटपटीत आलू भुजिया होतील फस्त!


एवढ्या मेहनतीने फराळाचे पदार्थ केले आणि ते लवकर खराब झाले तर? ५ गोष्टी करा, ना चव बदलेल-ना रंग...

कृती :- 

१. सर्वातआधी एका पॅनमध्ये थोडेसे खोबरेल तेल घेऊन त्यात ओट्स, पोहे घालून दोन्ही जिन्नस एकत्रित भाजून घ्यावे. 
२. त्यानंतर त्यात अक्रोड, बदामाचे छोटे तुकडे घालावेत हे सगळे जिन्नस मंद आचेवर हलकेच भाजून घ्यावेत. 
३. आता या मिश्रणात आपल्या आवडीचे सीड्स घालावेत. आपण भोपळ्याच्या बिया, अळशी, सूर्यफुलाच्या बिया देखील घालू शकतो. 
४. त्यानंतर हे सगळे जिन्नस एकत्रित ५ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्यावेत. 

५. सगळे जिन्नस भाजून झाल्यावर गॅस बंद करून त्यात एक टेबलस्पून मध, कॉर्नफ्लेक्स व ड्राय बेरीज घालाव्यात. 
६. आता एका डिशमध्ये बटर पेपर अंथरुन त्यावर हे तयार मुसळी काढून घ्यावेत. थोडा वेळ गार होण्यासाठी ठेवून द्यावेत. 
७. थंड झाल्यानंतर एका काचेच्या एअर टाईट कंटेनरमध्ये ही तयार मुसळी स्टोअर करुन ठेवावी. पुढील २० दिवस ही मुसळी अगदी व्यवस्थित खराब न होता चांगली टिकून राहील. 

अशा प्रकारे आपण बाहेर विकत मिळणारी महागामोलाची मुसळी घरीच्या घरीच झटपट तयार करु शकतो.

Web Title: Anjali Mukerjee Share's Easy Muesli Recipe How To make Muesli At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.