Lokmat Sakhi >Food > कपभर बदाम - अंजीरचे करा पौष्टीक लाडू; हाडं मजबूत - मेंदूही धावेल सुपरफास्ट

कपभर बदाम - अंजीरचे करा पौष्टीक लाडू; हाडं मजबूत - मेंदूही धावेल सुपरफास्ट

Anjeer Dry Fruit Ladoo - A Nutritious and Delicious Indian Sweet : मुलं बदाम - अंजीर खात नसतील तर, त्यांना पौष्टीक लाडू तयार करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2024 05:05 PM2024-07-24T17:05:57+5:302024-07-24T17:07:04+5:30

Anjeer Dry Fruit Ladoo - A Nutritious and Delicious Indian Sweet : मुलं बदाम - अंजीर खात नसतील तर, त्यांना पौष्टीक लाडू तयार करून द्या

Anjeer Dry Fruit Ladoo - A Nutritious and Delicious Indian Sweet | कपभर बदाम - अंजीरचे करा पौष्टीक लाडू; हाडं मजबूत - मेंदूही धावेल सुपरफास्ट

कपभर बदाम - अंजीरचे करा पौष्टीक लाडू; हाडं मजबूत - मेंदूही धावेल सुपरफास्ट

उत्तम आरोग्यासाठी आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे (Sweet dish). यासाठी फळे, भाज्या आणि ड्रायफ्रुट्स खाणं अवश्य आहे. पण काही मुलं भाज्या, फळे आणि ड्रायफ्रुट्स खाणं टाळतात (Healthy laddoo). मुख्य म्हणजे सुकामेवा खाताना मुलं नाकं मुरडतात (Nutritious).

लहान मुलांच्या योग्य वाढीसाठी आहारात ड्रायफ्रुट्स हवेच. जर मुलं ड्रायफ्रुट्स खाताना नाकं मुरडत असतील तर, त्यांना बदाम आणि अंजीरचा पौष्टीक लाडू तयार करून खायला द्या(Anjeer Dry Fruit Ladoo - A Nutritious and Delicious Indian Sweet).

अंजीर खाण्याचे फायदे

अंजीर हे सुपरफूड मानले जाते. अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. शिवाय याचा ग्लायसेमिक इंडेक्सही जास्त असल्याकारणाने रक्तातील साखर नियंत्रित राहते. नियमित भिजलेले अंजीर खाल्ल्याने हाडंही मजबूत राहतात. याव्यतिरिक्त यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात.

श्रीराम नेने सांगतात खा ६ पदार्थ; प्रोटीनचा खजिना- वाढतील मसल्स - मिळेल ताकद

बदाम खाण्याचे फायदे

बदाम खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यात प्रोटीन, अँटी-ऑक्सिडंट्सही असतात. शिवाय कॅलरीचं प्रमाण कमी असतं. यात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

अंजीर बदामाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

बदाम

अंजीर

काजू - बदाम सोडा; मुठभर स्वयंपाकघरातली १ गोष्ट खा; ताकद - उर्जा वाढेल; वजनही घटेल

भोपळ्याच्या बिया

तूप

कृती

सर्वात आधी पॅन गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात एक कप बारीक चिरलेला बदाम घालून भाजून घ्या. बदाम भाजून घेतल्यानंतर त्यात एक कप बारीक चिरलेला अंजीर, एक मोठा टेबलस्पून भोपळ्याच्या बिया, एक टेबलस्पून तूप घालून सर्व साहित्य भाजून घ्या.

सर्व साहित्य भाजून घेतल्यानंतर थोडं वेळ थंड होण्यासाठी ठेवा. मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, व खडबडीत साहित्य वाटून घ्या. वाटलेलं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या. थोडं मिश्रण घेऊन लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे बदाम आणि अंजीरचे पौष्टीक लाडू खाण्यासाठी रेडी.

Web Title: Anjeer Dry Fruit Ladoo - A Nutritious and Delicious Indian Sweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.