थंडीच्या दिवसात वातावरणातील बदलांमुळे इम्यूनिटी कमकुवत होते आणि सर्दी, खोकला असे आजार होतात. अशावेळी शरीराला ऊब मिळण्यासाठी आहारात गरम आणि पौष्टीक पदार्थांचा समावेश करायला हवा. (Anjeer Dry Fruit Ladoo Recipe) अनेकांकडे थंडीची चाहूल लागताच मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू करायला सुरुवात होते. या लाडूंमध्ये पौष्टीक पदार्थांचा समावेश असल्यानं तब्येत कायम चांगली राहण्यास मदत होते. याशिवाय अनावश्यक क्रेव्हिग्ससुद्धा टाळता येतात. (Anjeer Khajur Dry Fruits Ladoo Recipe)
अंजीर खाण्याचे फायदे
1) तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर डाएटमध्ये अंजीरचा समावेश करू शकता. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही अंजीरचा आहारात समावेश करू शकता. कारण अंजीर हे कमी कॅलरी असलेले अन्न आहे, जे वजन कमी करण्यास मदत करू शकते.
2) अंजीर हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप चांगले फळ मानले जाते. कारण त्यात जीवनसत्त्वे, पोटॅशियम, खनिजे, कॅल्शियमचे गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
३) जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा पोटाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही अंजीरचे सेवन करू शकता. अंजीरमध्ये आढळणारे गुणधर्म पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून आराम देतात.
४) अंजीरमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. अंजीर आणि दुधाचे सेवन करून कमकुवत हाडांची समस्या टाळता येते.
५) अंजीरमध्ये फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्वे आढळतात, जी मधुमेहासाठी उपयुक्त ठरू शकतात. एवढेच नाही तर अंजीर खाल्ल्याने इन्सुलिन नियंत्रित राहण्यास मदत होते.