Join us  

अनुष्का शर्माला आवडते बदाम दूध घालून केलेली 'ही' खास कॉफी- बघा तिची हटके रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2024 4:25 PM

Anushka Sharma's Recipe Of Almond Milk Coffee: अभिनेत्री अनुष्का शर्मा कशा पद्धतीची कॉफी पिते, याविषयी तिने माहिती सांगितलेला व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (how to make alomnd milk coffee?)

ठळक मुद्देअनुष्काला कशा पद्धतीची कॉफी घ्यायला आवडते याविषयीचा तिचा व्हिडिओ nancy_dehra या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री तसेच क्रिकेटर विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा नेहमीच चर्चेत असते. सुंदर चेहरा आणि मोहक हास्य यामुळे अनुष्काने तिचा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. काही महिन्यांपुर्वीच तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यापुर्वी मुलगी वामिका हिच्या संगोपनासाठी तिने चित्रपटांमधून तिने ब्रेक घेतला होता. त्यामुळे मागच्या काही वर्षांपासून ती बॉलीवूडपासून थोडी दूर झाली आहे. पण असं असलं तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून मात्र ती नेहमीच्या तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असते (special coffee recipe by actress Anushka Sharma). आता काही दिवसांपासून तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने तिला कशी कॉफी आवडते आणि ती कशी करायची, याची रेसिपी सांगितली आहे. (Anushka Sharma's Recipe Of Almond Milk Coffee)

 

अनुष्का शर्माने सांगितलेली स्पेशल कॉफी रेसिपी

अनुष्काला कशा पद्धतीची कॉफी घ्यायला आवडते याविषयीचा तिचा व्हिडिओ nancy_dehra या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

गोकर्णाचा वेल वाढला तरी फुलंच येईना? २ सोपे उपाय- एवढी फुलं येतील की वेचूनच दमाल..

ही कॉफी तयार करण्यासाठी अनुष्का बदाम दूध वापरते. आपल्याला माहितीच आहे अनुष्का वेगन आहे. म्हणजेच ती दूध तसेच दुधापासून तयार करण्यात आलेले कोणतेच पदार्थ खात नाही. यामुळे ती कॉफीसाठी खास बदामाचे दूध तयार करते.

 

बदामाचे दूध कसे तयार करायचे, याची रेसिपीही तिने सांगितली आहे. हे दूध करण्यासाठी काही बदाम रात्रभर पाण्यात भिजत घाला. त्यानंतर त्याची सालं काढून घ्या आणि त्यानंतर ते मिक्सरमध्ये घाला. त्यामध्ये थोडं पाणी घाला आणि त्याची अगदी पातळ पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये आणखी थोडं पाणी घातलं की ते झालं बदामाचं दूध. 

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी ५ पद्धतीने करा कोरफडीचा उपयोग, ओपन पोअर्स, डार्कसर्कल्स होतील गायब

आता साखर न घालता ब्लॅक कॉफी तयार करायची आणि त्यात थोडं बदामाचं दूध टाकायचं. अशा पद्धतीने तयार केलेली अलमंड मिल्क कॉफी प्यायला अनुष्का शर्माला आवडते. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अनुष्का शर्मा