Lokmat Sakhi >Food > सरसों का साग- मक्के की रोटी! अनुष्का शर्माचा हा फेवरिट मेन्यू, हिवाळ्यात करायलाच हवा असा पौष्टिक बेत

सरसों का साग- मक्के की रोटी! अनुष्का शर्माचा हा फेवरिट मेन्यू, हिवाळ्यात करायलाच हवा असा पौष्टिक बेत

Sarson da Saag Recipe: सरसोंका साग आणि मक्के की रोटी! या अस्सल पंजाबी जेवणाची खरी मजा थंडीच्या दिवसांतच आहे. अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma's favorite menu) नुकताच या पदार्थाचा आस्वाद घेतला असून तुम्हालाही खावं वाटत असेल तर ही बघा एक फक्कड रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2023 01:04 PM2023-01-05T13:04:52+5:302023-01-05T18:17:37+5:30

Sarson da Saag Recipe: सरसोंका साग आणि मक्के की रोटी! या अस्सल पंजाबी जेवणाची खरी मजा थंडीच्या दिवसांतच आहे. अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma's favorite menu) नुकताच या पदार्थाचा आस्वाद घेतला असून तुम्हालाही खावं वाटत असेल तर ही बघा एक फक्कड रेसिपी...

Anushka Sharma's favorite menu, Sarsonka saag and makke ki roti, How to make sarson da saag? Special recipe by Kunal Kapoor | सरसों का साग- मक्के की रोटी! अनुष्का शर्माचा हा फेवरिट मेन्यू, हिवाळ्यात करायलाच हवा असा पौष्टिक बेत

सरसों का साग- मक्के की रोटी! अनुष्का शर्माचा हा फेवरिट मेन्यू, हिवाळ्यात करायलाच हवा असा पौष्टिक बेत

Highlightsहा पदार्थ थंडीच्या दिवसांत खाण्यात भारीच मजा आहे. शिवाय हे जेवण थोडं उष्ण प्रकारचं असल्याने ते थंडीतच चांगलं पचतं, असं म्हटलं जातं.

असे काही विशिष्ट पदार्थ असतात जे त्या- त्या ऋतूमध्येच खाण्यात मजा असते. त्यापैकी एक पदार्थ म्हणजे सरसोंका साग आणि मक्के की रोटी (Sarsonka saag and makke ki roti). हा पदार्थ थंडीच्या दिवसांत खाण्यात भारीच मजा आहे. शिवाय हे जेवण थोडं उष्ण प्रकारचं असल्याने ते थंडीतच चांगलं पचतं, असं म्हटलं जातं. म्हणूनच तर अभिनेत्री अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma) नुकताच या पदार्थाचा आस्वाद घेतला असून याबाबतची तिची इन्स्टाग्राम पोस्टही सोशल मिडियावर चांगलीच गाजते आहे. (Special recipe by Kunal Kapoor)

सरसोंका साग करण्याची रेसिपी
१. मोहरीची हिरवी भाजी ३ वाट्या आणि पालक, मेथी, मुळ्याचा पाला असं सगळं प्रत्येकी एकेक- वाटी घ्यावी. या भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्याव्या.

सारखे करपट ढेकर येतात- पोट नेहमीच फुगलेलं वाटतं? करून बघा तज्ज्ञांनी सांगितलेला १ उपाय

२. पाऊण कप हरबरा डाळ एक ते दिड तास पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर कढईमध्ये पाणी टाकून त्यात ती थोडी शिजवून घ्यावी. शिजवताना त्यात शलगम ही कंद प्रकारातली भाजीही थोडी टाकावी. 

 

३. डाळ चांगली शिजली की त्यात चिरलेली मोहरी, पालक, मेथी टाकावी. आणि ती ही १० ते १२ मिनिटे शिजवून घ्यावी. यानंतर शिजलेल्या भाज्या आणि डाळ कढईतून बाहेर काढा. थोडं थंड होऊ द्या आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्या. अगदी बारीक पेस्ट करू नका. थोडं जाडं- भरडं ठेवलं तर चव अधिक खुलेल.

कपड्यावर तेलाचा डाग लागला? २ सोपे उपाय, कपडा खराब न होता डाग चटकन निघून जातील

४. आता गॅसवर एक कढई तापायला ठेवा. त्यात २ टेबलस्पून तूप टाका. त्यात लसूण टाकून चांगला परतून घ्या. लसून परतून झाला की बारीक चिरलेला कांदा, मिरची, आलं घालून परतून घ्या.

५. त्यानंतर कढईमध्ये १ टेबलस्पून मक्याचं पीठ टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की एखाद्या मिनिटाने त्यात मिक्सरमधून वाटून घेतलेली भाज्यांची प्युरी टाका.

 

६. त्यात आता चवीनुसार मीठ घाला. १० ते १२ मिनिटे ही भाजी चांगली शिजवून घ्या. मधून- मधून हलवत रहा आणि चांगली वाफ आली की गॅस बंद करा.

लहानपणीच मुलांची हाडं ठणकतात? हाडांची ताकद टिकून राहण्यासाठी करा फक्त ४ गोष्टी 

७. तयार झालेला सरसोंका साग एका भांड्यात काढून घ्या. त्यावर पुन्हा चांगलं तूप, लाल मिरची, हिंग यांची फोडणी घाला. हवं तर वरतून थोडं क्रिमही टाकू शकता. अशा पद्धतीने मस्त गरमागरम, चवदार सरसोंका साग तयार. मक्याची रोटी किंवा आपल्या साध्या पोळी- भाकरीसोबतही तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता.  

मक्के की रोटी रेसिपी

 

Web Title: Anushka Sharma's favorite menu, Sarsonka saag and makke ki roti, How to make sarson da saag? Special recipe by Kunal Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.