प्रोटीन शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मटारमध्ये प्रोटीन चांगल्या प्रमाणात आढळतात. ताजे मटार हिवाळ्यात मिळतात, त्यामुळे लोक तेव्हाच मटार खाणं पसंत करतात. बरेच लोक फ्रोझन मटार वापरणं टाळतात. त्यांना असं वाटतं की, ते आरोग्यासाठी चांगलं नाही, यामुळे आजारी पडू शकतो. पण न्यूट्रिशनिस्ट भावेश गुप्ता यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
मटार नियमित खाल्ल्यास प्रोटीन मिळतात आणि अनेक व्हिटामीन्स, मिनरल्स मिळतात. ९९ टक्के लोकांमध्ये याबाबत एक गैरसमज आहे आणि त्यामुळे ते प्रोटीनचा चांगला सोर्स असलेले मटार खाणं टाळतात. यामुळे व्हिटॅमिन्स, मिनरल्सची शरीरात कमतरता निर्माण होऊ शकते. तज्ज्ञांनी फ्रोझन मटार बनवण्याची पद्धत समजावून सांगितली आणि याबद्दलची इतरही माहिती दिली.
फ्रोझन मटार कसे बनवतात?
फ्रोझन मटार तयार करण्यासाठी, ते आधी सोलले जातात. त्यानंतर -१८ अंश सेल्सिअसवर फ्रीज केले जातात. यामुळे, त्यांच्या आत मायक्रोबियल ग्रोथ आणि एंजाइमेटिक ब्रेकडाउन होत नाही आणि ते बराच काळ टिकतात.
तज्ज्ञाने एका अभ्यासाबद्दल सांगितलं, ज्यामध्ये ताज्या आणि फ्रोजन भाज्यांची तुलना केली गेली. या भाज्यांमध्ये मटारचाही समावेश होता. दोन्ही प्रकारच्या भाज्यांच्या पोषणामध्ये विशेष फरक आढळला नाही. इतर अनेक अभ्यासांमध्ये, फ्रोजन केलेल्या भाज्या या ताज्या भाज्यांइतक्याच पोषक असल्याचं आढळून आलं.
काही लोकांना असं वाटतं की फ्रोजन मटारचं शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह किंवा ॲडिटीव्ह त्यामध्ये टाकले जातात. पण न्यूट्रिशनिस्टच्या म्हणण्यानुसार, बाजारातील फ्रोझन मटारमध्ये असं काहीही नाही. कारण -१८ अंश सेल्सिअस तापमानात कोणतीही बायोलॉजिकल रिएक्शन होत नाही.
चवीत जाणवतो फरक
या दोन्ही मटारमध्ये फक्त चवीचा फरक आढळतो. पण ते माणसांना नेमकं काय खायला आवडतं यावर अवलंबून असतं. फ्रोझन मटार ताज्या मटार सारखेच चवीला लागत नाहीत. मात्र पोषक घटक तितकेच असतात त्यामुळे त्याचा शरीराला फायदाच होतो.