Lokmat Sakhi >Food > Are Mangoes Making You Sick : आमरसावर ताव मारल्यावर किंवा भरपूर आंबे खाल्ल्यावर 1 चूक अजिबात करू नका, पोट बिघडेल-पस्तावाल

Are Mangoes Making You Sick : आमरसावर ताव मारल्यावर किंवा भरपूर आंबे खाल्ल्यावर 1 चूक अजिबात करू नका, पोट बिघडेल-पस्तावाल

Are Mangoes Making You Sick ? प्रत्येक गोष्टीचे काही नियम असतात, ते पाळले गेले नाहीत तर तब्येतीला त्याचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 11:19 AM2022-04-28T11:19:50+5:302022-04-28T12:14:10+5:30

Are Mangoes Making You Sick ? प्रत्येक गोष्टीचे काही नियम असतात, ते पाळले गेले नाहीत तर तब्येतीला त्याचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे....

Are Mangoes Making You Sick Avoid One Thing With Mango Stomach upset | Are Mangoes Making You Sick : आमरसावर ताव मारल्यावर किंवा भरपूर आंबे खाल्ल्यावर 1 चूक अजिबात करू नका, पोट बिघडेल-पस्तावाल

Are Mangoes Making You Sick : आमरसावर ताव मारल्यावर किंवा भरपूर आंबे खाल्ल्यावर 1 चूक अजिबात करू नका, पोट बिघडेल-पस्तावाल

Highlightsआंब्यावर किंवा आमरसावर गटागटा पाणी पिणे टाळावे.  आंब्यावर पाणी प्यायल्याने पोट खराब होऊन जुलाब होऊ शकतात.  ३. गॅसेस 

Are Mangoes Making You Sick ? उन्हाळा म्हटला की आमरस आलाच. वर्षातून एकदाच येणारा हा फळांचा राजा आपल्यातील बहुतांश सगळ्यांनाच आवडतो. उन्हाळ्याच्या दिवसांत उकाड्याने शरीराची लाहीलाही झालेली असताना जेवण नको वाटते. अशावेळी आंबा खाल्ला किंवा जेवणात आंब्याचा रस खाल्ला तर एकदम एनर्जी आल्यासारखे होते. आंब्यामध्ये शरीराला आवश्यक असणारी बरीच खनिजे, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स असतात. त्यामुळे आंबा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते असे म्हटले जाते. आंब्याचा रस म्हणजे तर या दिवसांत पर्वणीच असते. एरवी आपल्याला २ पोळ्याही नको होतात पण आंब्याचा रस असल्यावर नकळत आपण चार घास जास्तच जेवतो. यातही हापूस आंबा, पायरी, गावठी, केसर असे आंब्याचे वेगवेगळे प्रकार येतात 

(Image : Google)
(Image : Google)

गुढीपाडव्यापासून सुरू होणारा आंब्याचा हंगाम पाऊस पडेपर्यंत सुरू राहतो आणि आपण सगळे त्यावर यथेच्छ ताव मारत राहतो. आंब्याचा रस पचावा यासाठी त्यामध्ये मीरपूड किंवा तूप घालून खाण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी उन्हाळ्यात खास आमरस आणि पुरणपोळी, आमरस आणि कुरडई असे बेत आखले जातात. हे सगळे खरे असले तरी आमरस खाताना किंवा खाऊन झाल्यावर एक गोष्ट अजिबात करायची नाही. ती म्हणजे आमरसावर पाणी पिणे (Avoid One thing With Mango is Water) . उन्हाळ्यामुळे आपली लाहीलाही होत असते. त्यामुळे आपल्याला सतत पाणी पाणी होते. गोड आणि तेलकट खाल्ल्यावर तर पाणी जास्त प्यावेसे वाटते. असे असले तरी आमरसाचे जेवण झाल्यावर किंवा आंबा खाल्ल्यावर अजिबात पाणी प्यायचे नाही. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. लीना बावडेकर सांगतात, आमरसावर पाणी प्यायल्यास कोणते त्रास होतात...

१. अजीर्ण 

आंब्यावर किंवा आमरसावर पाणी प्यायल्याने अजीर्ण झाल्यासारखे होते. यामुळे पचनक्रिया मंदावते. त्याचा भुकेवर परिणाम होतो आणि मग जेवण न गेल्याने अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळे आंबा खाल्ल्यावर किंवा कोणतेही फळ खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये.

२. जुलाब 

आंब्यावर पाणी प्यायल्यास आंबा बाधण्याची शक्यता असते. आपल्याला साधारणपणे जेवताना आणि जेवण झाल्यावर पाणी पिण्याची सवय असते. उन्हाळ्यात तर जास्त पाणी लागते. पण जेवणात आमरस असेल तर त्यावर पाणी पिणे टाळायला हवे. कारण अनेकदा आंब्यावर पाणी प्यायल्याने पोट खराब होऊन जुलाब होऊ शकतात. 

(Image : Google)
(Image : Google)

३. गॅसेस 

आंबा खाल्ल्यावर साधारणपणे पाणी पाणी होण्याची शक्यता असते. मात्र अशावेळी किमान अर्धा ते १ तास पाणी पिणे टाळावे. अगदीच प्यायचे असेल तर एखादा तिखट पदार्थ खाऊन एखादा घोट प्यावा. पण आमरस खाल्ल्यावर त्यावर लगेच पाणी प्यायल्यास गॅसेस किंवा अॅसिडीटी, अपचन होण्याची शक्यता असते. अनेकदा आंब्यावर पाणी प्यायल्यास छातीत जळजळ झाल्यासारखेही होते, त्यामुळे आंब्यावर किंवा आमरसावर गटागटा पाणी पिणे टाळावे.  

Web Title: Are Mangoes Making You Sick Avoid One Thing With Mango Stomach upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.