Lokmat Sakhi >Food > कुकरची शिट्टी धड होत नाही, पाणी फसफसून बाहेर उडतं? ३ सोपे उपाय, कुकरचे कारंजे बंद...

कुकरची शिट्टी धड होत नाही, पाणी फसफसून बाहेर उडतं? ३ सोपे उपाय, कुकरचे कारंजे बंद...

Are you also tired of water overflowing from your pressure cooker? : How to Keep Your Pressure Cooker Clean? : कुकरची शिट्टी अनेकदा नीट होत नाही, अन्न शिजत नाही पाणी गळतं किंवा शिट्टी होताना उडतं, त्यावर हे सोपे उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2023 01:09 PM2023-03-06T13:09:47+5:302023-03-06T13:11:12+5:30

Are you also tired of water overflowing from your pressure cooker? : How to Keep Your Pressure Cooker Clean? : कुकरची शिट्टी अनेकदा नीट होत नाही, अन्न शिजत नाही पाणी गळतं किंवा शिट्टी होताना उडतं, त्यावर हे सोपे उपाय..

Are you also tired of water overflowing from your pressure cooker? : How to Keep Your Pressure Cooker Clean? | कुकरची शिट्टी धड होत नाही, पाणी फसफसून बाहेर उडतं? ३ सोपे उपाय, कुकरचे कारंजे बंद...

कुकरची शिट्टी धड होत नाही, पाणी फसफसून बाहेर उडतं? ३ सोपे उपाय, कुकरचे कारंजे बंद...

स्वयंपाक झटपट व चविष्टय बनवता यावा यासाठी आपल्या किचनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरतो. मिक्सर, फूड प्रोसेसर, इलेक्ट्रिक ब्लेंडर, फ्रायर, कुकर अशा भांड्यांचा वापर करुन चटकन स्वयंपाक करता येतो. स्वयंपाक करत असताना स्वयंपाकघरात आपण विविध भांडय़ांचा व उपकरणांचा वापर करत असतो. अर्थात, प्रत्येक भांडय़ाला त्याच्या अंगभूत वैशिष्टय़ांमुळे स्वत:चे असे एक नाव असते. आयुर्वेदानुसार, स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही स्वयंपाकाशी जवळचा संबंध असतो. कारण स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी कोणत्या धातूची आहेत यावर त्यामध्ये केलेल्या पदार्थाचा गुणधर्म व त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम अवलंबून असतो.

आपण रोजच्या वापरात, कुकर, मिक्सर, या उपकरणांचा वापर आवश्यकतेनुसार करतो. डाळ, भात किंवा इतर अन्नपदार्थ शिजविण्यासाठी आपण कुकरचा वापर करतो. कुकरमध्ये भात किंवा काही शिजविण्यास ठेवले तर फक्त ३ शिट्यांमध्ये तो पदार्थ शिजून तयार होतो. मिक्सरचा वापर करून देखील आपण झटपट कोणत्याही पदार्थाची बारीक, पातळ पेस्ट तयार करु शकतो. अशाप्रकारे या भांड्यांचा वापर करुन आपण काही मिनिटांतच स्वयंपाक तयार करु शकतो. रोजचा डाळ, भात शिजवण्यासाठी आपण कुकरचा वापर करतो. परंतु काहीवेळा कुकर लावला असताना, शिट्टी झाल्यावर त्या छिद्रांतून आतील पाणी फसफसून बाहेर पडते. असे झाल्यामुळे कुकर तर खराब होतोच, शिवाय हे पाणी इतरस्र पडल्यामुळे किचन देखील खराब होते. अशावेळी नक्की काय करावे हा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. काही सोप्या टिप्स लक्षांत ठेवून आपण कुकरमधून फसफसून बाहेर येणारे पाणी थांबवू शकतो(Are you also tired of water overflowing from your pressure cooker? : How to Keep Your Pressure Cooker Clean?).

नक्की काय आहेत उपाय? 

कुकरमध्ये, डाळ शिजत घातल्यानंतर शिट्टी झाली की, काहीवेळा प्रेशरमुळे आतील हळदीचे पाणी फसफसून बाहेर पडते. यामुळे आपला कुकर तर खराब होतोच. त्याचबरोबर हे पाणी सगळीकडे उडाल्यामुळे किचन देखील खराब होते. असे होऊ नये म्हणून ३ सोपे पर्याय लक्षांत ठेवूयात. 


 

१. टिश्यू पेपरचा वापर :- सर्वप्रथम कुकरची शिट्टी काढून घ्यावी. ज्या भागांत आपण शिट्टी अडकवतो त्या भागांत एक टिश्यू पेपर खोचून घ्यावा. टिश्यू पेपर लावल्यानंतर त्यावर रोजप्रमाणे शिट्टी लावून घ्यावी. आता हा कुकर नेहमीप्रमाणे गॅसवर ठेवून सुरु करावा. असे केल्यामुळे जरी शिट्टीच्या छिद्रांतून फसफसून पाणी बाहेर आलेच तरी टिश्यू पेपर ते जास्तीचे पाणी शोषून घेईल. यामुळे आपला कुकर खराब न होता तसाच्यातसाच स्वच्छ राहिल.  

२. तेलाचा वापर :- कुकरचे झाकण लावण्याआधी, कुकरच्या झाकणांवर जिथे आपण रबरी काळा गॅस्केट अडकवितो त्यांवर फूड ब्रशच्या मदतीने थोडेसे तेल लावून घ्यावे. त्याचप्रमाणे कुकरच्या झाकणाला आतल्या बाजूने जिथे शिट्टीचे नोझल असते त्या भागांवर देखील फूड ब्रशच्या मदतीने थोडेसे तेल लावून घ्यावे. असे केल्याने कुकरमधील प्रेशरमुळे फसफसून बाहेर येणाऱ्या पाण्याला आळा बसतो. परिणामी, हे पाणी बाहेर येत नाही. 

३. स्टीलचा चमचा किंवा वाटी :- कुकरमध्ये डाळ किंवा इतर काही पदार्थ शिजत ठेवतांना त्यात एक स्टीलचा स्वच्छ धुतलेला चमचा किंवा वाटी ठेवावी. त्यानंतर कुकरचे झाकण बंद करुन घ्यावे. आता आपण नेहमीप्रमाणे जसा कुकर लावतो तसाच कुकर लावून घ्यावा. असे केल्याने कुकरच्या आतमधील पाणी शिट्टीच्या छिद्रांतून फसफसून बाहेर येत नाही.

Web Title: Are you also tired of water overflowing from your pressure cooker? : How to Keep Your Pressure Cooker Clean?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.