सकाळची वेळ ही सगळ्यांसाठीच प्रचंड गडबडीची असते. घरातील सदस्यांची खूप घाई गडबड असते. कोणाचं टिफीन, कोणाचा नाश्ता, यात महिलेची पूर्ण धांदल उडते. कितीही लवकर उठून स्वयंपाक बनवण्याचा विचार केला तर उशीर हा होतोच. जर महिला ही वर्किंग वूमन असेल तर तिला सगळ्यांचं आवरून स्वतःच देखील आवरायचं असतं. तिच्यासाठी खरंतर हा टास्क म्हणावं लागेल. जर तुम्हाला घरचं काम लवकर, वेळेवर आणि व्यवस्थित पूर्ण करायचं असेल तर काही किचन टिप्स फॉलो करा.
१. सकाळी कोणती भाजी बनवायची आहे, ती भाजी रात्री आदल्या दिवशी चिरून ठेवा. ती भाजी फ्रिजमध्ये एका डब्ब्यात ठेऊन द्या. जेणेकरून सकाळी तुमचा भाजी चिरण्याचा वेळ वाचेल. यासह झटपट जेवण पूर्ण होईल.
२. डाळी रात्रीच भिजत ठेवा. राजमा, हरभरा आणि डाळ अशा प्रकारच्या कडधान्य रात्री भिजवून ठेवणे उत्तम ठरेल. हरभरा आणि डाळ अशा गोष्टी आहेत, ज्यांना शिजवण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यांना भिजवल्याने पोषणमूल्ये वाढते. तसेच पटकन शिजते. त्यामुळे ही ट्रिक जरूर ट्राय करा.
३. रात्री किचन आवरुन झोपा. सकाळी उठून आवराल तर बराच वेळ जाईल. जर तुम्ही रात्री किचन साफ करून, आवरुन झोपलात तर सकाळी उठल्यावर तुमचा वेळ तर वाचेल शिवाय तुम्ही पॅनिक होणार नाही. यासह प्रत्येक सामान जागच्या जागी सापडेल.
४. घरातील लोकांच्या आवडी-निवडींचा विचार रात्रीच करून ठेवा, जेणेकरून सकाळी उठून तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय बनवायचे आहे, याची कल्पना येईल. यामुळे घरातील सदस्यांचा मूड आणि तुमचा वेळ दोन्ही वाचेल.