अनेकांना आवडणारा पेय म्हणजे सोलकढी (Goan style Solkadhi). ग्लासभर सोलकढी पिण्याचे अनेक फायदे आहेत. मुख्य म्हणजे याने पचनक्रिया सुधारते. बरेच जण जेवण केल्यानंतर सोलकढी पितात. हॉटेलमध्ये आपण जेवणानंतर आवर्जून सोलकढी पितो. सदाबहार गायिका आशा भोसलेंना देखील सोलकढी फार आवडते (Asha Bhosale). असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यांनी स्वतः सोलकढीची एक भन्नाट रेसिपी मुलाखतीदरम्यान शेअर केली होती (Cooking Tips).
जर आपल्याला गोवन स्टाईल अस्सल चवीची सोलकढी करायची असेल तर, ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पाहा. नारळाचं दूध काढता येत नाही म्हणून सोलकढी करणं टाळू नका, अवश्य एकदा ही रेसिपी करून पाहा(Asha Bhosle’s Favourite Solkadhi Recipe ).
सोलकढी करण्यासाठी लागणारं साहित्य
किसलेलं खोबरं
हिरव्या मिरच्या
लसूण
आलं
साखर
मीठ
पांढऱ्या शर्टाच्या कॉलरवरचे हट्टी डाग घासूनही निघत नाही? फक्त २ उपाय; कपडे दिसतील चकाचक
कोथिंबीर
हिंग
कृती
सर्वात आधी ओला नारळ किसून घ्या. मिक्सरच्या भांड्यात किसलेलं खोबरं, ३ हिरव्या मिरच्या, ४ लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि पाणी घालून पेस्ट तयार करा. पेस्ट तयार केल्यानंतर एका बाऊलवर चाळण ठेवा. त्यात पेस्ट ओतून खोबऱ्याचं दूध गाळून घ्या.
वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय
एका बाऊलमध्ये २ ते ३ कोकम घ्या. त्यात पाणी घालून कोकमचं पाणी तयार करा. कोकमचं पाणी खोबऱ्याच्या दुधात घालून मिक्स करा. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर आणि चिमुटभर हिंग घालून मिक्स करा आणि सर्व्ह करा. अशा प्रकारे गोवन स्टाईल सोलकढी पिण्यासाठी रेडी.