Join us  

Ashadhi Akadashi 2024 : एकादशीला करा उपवासाचे मेदूवडे, १ वाटी भगरीचे २० कुरकुरीत खमंग वडे-पचायलाही हलके

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 1:33 PM

Ashadhi Akadashi 2024 (Ashadhi Akadashi Information in Marathi) : हे वडे तुम्ही उपवासाच्या दिवसाव्यतिरिक्त इतर कधीही नाश्त्याला बनवू शकता.

एकादशी (Ashadhi Akadashi 2024 ) दुप्पट खाशी ही म्हण तुम्ही खूपदा ऐकली असेल. एकादशीच्या दिवशी प्रत्येकाच्याच घरात उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. (Upvasache Padarth Recipe) खिचडी, बटाट्याचा चिवडा, साबुदाणा वडा, भगर असे तेच तेच पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही उपवासाची मेदू वडा ट्राय करू शकता. (Akadashi Special Food) उपवासाला खायला चालणारे बेसिक साहित्य वापरून तुम्ही कुरकुरीत मेदू वडे बनवू शकता. मेदू वडे करण्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. (Ashadhi Akadashi Padarth In Marathi)

उपवासाचा मेदू वडा कसा बनवायचा? (How To Make Upvasacha Meduvada)

१) सगळ्यात आधी १ ते २ वाटी भगर २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. नंतर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यात १ चमचा सैंधव मीठ, धुवून घेतलेली भगर घाला. यात  १ चमचा सैंधव मीठ घाला.  चमच्याने ढवळून त्यावर  झाकण ठेवा. १० मिनिटांत भगर शिजल्यानंतर गॅस बंद करा. 

२)शिजवलेली भगर थंड करून एका ताटात काढून घ्या. त्यात २ चमचे दाण्याचे कूट घाला. २ चमचे किसलेलं सुकं खोबरं घाला. २ ते ३  बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २ चमचे साबुदाण्याचे पीठ घाला. साबुदाणा घरीच मिक्सरला फिरवून घ्या.  त्यात १ उकडलेला बटाटा किसून घाला, तुम्ही बटाटा हाताने कुस्करूनही घालू शकता.  हे हाताला चिटकायला लागले की त्यात १ चमचा शेंगदाण्यांचे तेल घाला.  

३) थोडा पाण्याचा हात लावून पसरट ताटात हे मिश्रण मळून घ्या.  गोळे मळून झाल्यानंतर व्हिडीओमध्ये दाखवल्यानुसार वडे तयार करून घ्या. वड्यांना मेदूवड्याप्रमाणे आकार द्या. सर्व वड्यांना आकार दिल्यानंतर कढईत तेल गरम करायला ठेवा. हे वडे तुम्हाला मेदू वड्यांप्रमाणे डिप फ्राय करावे लागतील. 

केंसाची वाढ खुंटली-टक्कल पडतंय? कोलेजनयुक्त ५ पदार्थ रोज खा, भराभर वाढतील केस

४) तेल गरम असायला हवं, मिडियम टू हाय फ्लेमवर दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या. तयार आहेत गरमागरम मेदू वडे. हे वडे तुम्ही उपवासाच्या दिवसाव्यतिरिक्त इतर कधीही नाश्त्याला बनवू शकता.  हे मेदू वडे तुम्ही खोबऱ्याची ओली चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.