(Image Credit- indianveggiedelight, vegrecipesofindia )
एकादशीचा (Ashadhi Ekadashi 2022) उपवास घरातल्या एक दोन जणांचा असला तरी फराळाचे पदार्थ मात्र सगळ्यांनाच आवडीनं खायचे असतात. साबुदाण्याची खिचडी, रताळ्याचा शिरा, केळी, बटाट्याचे कुरकुरीत वेफर्स, खारे शेंगदाणे अन् बरंच काही. यापैकी सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे साबुदाणा वडे. (How to make sabudana vada) साबुदाण्याचे वडे बनवण्याची फर्माईश प्रत्येक घरातल्या महिलांना पूर्ण करावीच लागते. (How to make sabudana vada crispy)
खुसखुसित, खमंग वडे खातच राहावेसे वाटतात. (How to make Crispy Sabudana Vada Recipe at Home) पण अनेकदा सर्व साहित्य व्यवस्थित घालूनही वडे हवेतसे बनत नाहीत खूपच तेलकट होतात. म्हणूनच या लेखात तुम्हाला चविष्ट, दाणेदार वडे बनण्याच्या काही सोप्या टिप्स आणि रेसेपी सांगणार आहोत. (Sabudana Vada Recipe)
टिप (How to make sabudana vada less oily)
१) साबुदाणे वडे चांगले येण्यासाठी साबुदाणे व्यवस्थित भिजवलेले आणि फुललेले असावेत.
२) उकडलेले बटाटे कोरडे करून घ्या. जर बटाटा ओला असेल तर चिकटपणा येतो. शक्यतो बटाटे किसू नका. बटाटे हातानं कुस्करून घ्या.
३) साबुदाणा वडे मंद आचेवर तळा. वडे तयार करताना हाताला तेल लावा.
साहित्य
साबुदाणे- १ कप
दाण्याचे कूट- २ कप
हिरव्या मिरच्या- ३ ते ४
उकडलेले बटाटे - ४
लाल तिखट - २ टिस्पून
मीठ- चवीप्रमाणे
कृती
१) सगळ्यात आधी साबुदाणे मोठ्या ताटात घ्या. त्यात मिक्सरमधून बारीक केलेली हिरवी मिरची, दाण्याचं कूट, १ टेबलस्पून लाल मिरची पावडर, १ टेबलस्पून मीठ, कुस्करलेले बटाटे एकजीव करा.
२) आता लहान गोळे बनवून हलक्या हाताने प्रेस करा. हवंतर तुम्ही बदामाचा आकारही या गोळ्यांना देऊ शकता.
३) कढईमध्ये तेल टाकून मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत वडे तळून घ्या.