Join us  

आषाढी एकादशी स्पेशल: बाहेरुन मस्त कुरकुरीत खमंग, आतून मऊ-हलके साबुदाणा वडे करण्याची १ ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 5:47 PM

Ashadhi ekadashi 2023 : साबुदाणे वडे सर्वांच्याच पसंतीचे असतात. साबुदाणे वडे कधी जास्त चिकट होतात तर कधी अजिबात मनासारखे होत नाहीत.

आषाढी एकादशीला (Ashadhi ekadashi 2023) नेहमीच घरांघरात फराळाचे पदार्थ बनवले जातात. कारण एकादशी दुप्पट खाशी हे म्हटलंय ते काही खोटं नाही. काहीजण उपवासाच्या वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद घेण्यासाठी उपवास करतात. (How to make sabudana Vada) उपवास म्हटलं की साबुदाणे आणि बटाटे हे पदार्थ आलेच. (Sabudanavada Making Tips)

साबुदाणे वडे सर्वांच्याच पसंतीचे असतात. साबुदाणे वडे कधी जास्त चिकट होतात तर कधी अजिबात मनासारखे होत नाहीत. साबुदाणे वडे बनवण्याची परफेक्ट पद्धत पाहूया. (Cooking Hacks & Tips) साबुदाणा उकडलेल्या बटाट्यात मिसळून त्यात मसाले टाकले जातात. त्यानंतर त्याचे वडे तयार करून तळले जातात. (How to make perfect sabudana vada sabudane vade recipe)

साहित्य- 

1 किलो, बटाटे

1 कप साबुदाणा

2 टीस्पून  उपवासाचे मीठ

1/2 कप (जाडसर ग्राउंड) शेंगदाणे 

1 टीस्पून लाल मिरची पावडर

1 टीस्पून चिरलेली कोथिंबीर

1 टीस्पून हिरव्या मिरच्या 

1 लिंबाचा रस 

तेल - तळण्यासाठी

साबुदाणे वडे बनवण्याची कृती

साबुदाणे धुवून रात्रभर भिजत ठेवा. सकाळी साबुदाणे पूर्ण भिजलेले तुम्हाला दिसतील. बटाटे उकडून घ्या बटाटे उकडल्यानंतर त्यात जास्त पाणी राहणार नाही याची काळजी घ्या. उकडलेले बटाटे, मीठ, शेंगदाणे, मीठ, लाल तिखट, हिरवी धणे, हिरवी मिरची आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. या मिश्रणाचे गोलाकार वडे बनवा आणि गरमागरम तेलात तळून घ्या.  कुरकुरीत, स्वादीष्ट  साबुदाणा वडे हिरव्या चटणीसह सर्व्ह करा.

१) वड्याच्या मिश्रणात जास्त ओलावा असल्याने ते तळताना तुटण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही ओले उकडलेले बटाटे वापरले आहेत किंवा साबुदाणा नीट भिजवला नाही. - तेलाचे तापमान योग्य नाही ही वडे तुटण्याची कारणं असू शकतात.

२) साबुदाणा भिजल्यावर जास्तीचे पाणी काढून फ्रीजमधील हवाबंद डब्यात साठवा. ते रेफ्रिजरेटरमध्ये 3-4 दिवस चांगले राहते

३) साबुदाणा भिजवण्यासाठी गरम पाणी वापरू नका. गरम पाण्यामुळे साबुदाणा चिकट होतो.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न