आषाढी एकदशीचा (ashadhi ekadashi) उपवास सुसह्य करण्यासाठी एक पोटभरीचा पदार्थ म्हणजे उपवासाचं भाजणीचं थालीपीठ. भाजणीच्या थालीपीठने ॲसिडिटी, अपचन असा त्रास होत नाही. त्यामुळे बरेच जण हा पदार्थ उपवासाच्या दिवशी आवर्जून करतातच. पण काही जणींना त्याच्यात कोणते पदार्थ किती प्रमाणात घालावे, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे त्यांनी केलेले थालीपीठ मग कधी कडक तर कधी वातड होतात. म्हणूनच आता या काही सोप्या टिप्स पाहा (upvasache thalipith recipe in marathi). यामुळे तुम्ही केलेलं उपवासाच्या भाजणीचं थालीपीठ नक्कीच मऊसूत, खमंग आणि चवदार होईल. (how to make upvas bhajani thalipith)
उपवास भाजणीचं थालीपीठ करण्याची रेसिपी
साहित्य
२ कप भाजणीचं पीठ
१ उकडलेला बटाटा
२ टेबलस्पून दाण्याचा कूट
कपाट, घर आवरताना जुन्या, खराब वस्तू टाकूनच द्याव्या वाटत नाही? तुम्हाला 'हा' आजार असू शकतो
अर्धा कप दही
१ टीस्पून मिरचीची पेस्ट किंवा चवीनुसार लाल तिखट
चवीनुसार मीठ
१ टेबलस्पून तूप
कृती
सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये भाजणीचं पीठ काढून घ्या.
त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून टाका. बटाटा टाकल्याने थालीपीठ कडक होत नाही. त्यांना एक छान मऊपणा येतो.
महागडं फेशियल, बॉडी पॉलिशिंग करण्यापेक्षा 'हा' उपाय करा, काही मिनिटांतच मिळेल ब्रायडल ग्लो..
यानंतर दही, मिरचीची पेस्ट किंवा तिखट, मीठ, दाण्याचा कूट टाका. यानंतर पाणी टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित मळून घ्या.
हे पीठ खूप घट्ट भिजवू नये. अन्यथा थालीपीठ कडक, वातड होतात.
ऑफिसमधून घरी गेल्यावर खूप गळून जाता? दुपारी ४ नंतर १ गोष्ट आठवणीने करा- थकवा पळून जाईल
यानंतर एका प्लास्टिकच्या पिशवीला तूप लावा. त्यावर आपण मळून घेतलेल्या पिठाचा एक छोटा गोळा ठेवा आणि हाताने थालीपीठ थापून घ्या. थालीपीठ खूप पातळ थापू नये. त्यामुळेही त्याला कडकपणा येतो.
आता गॅसवर तवा गरम करायला ठेवा. या तव्यावर तूप सोडा आणि नंतर त्यावर आपण थापलेलं थालीपीठ टाका. थालीपीठ भाजताना त्यावर झाकण ठेवा. जेणेकरून थालीपीठला छान खमंग, मऊपणा येतो.