Lokmat Sakhi >Food > आषाढी एकादशी स्पेशल : करा उपवासाची इडली- मऊ लुसुलुशीत इडली करा झटपट-पावसाळ्यात पचायलाही हलकी

आषाढी एकादशी स्पेशल : करा उपवासाची इडली- मऊ लुसुलुशीत इडली करा झटपट-पावसाळ्यात पचायलाही हलकी

Ashadhi Ekadashi Special Farali Idli: आषाढी एकादशीच्या दिवशी तेच ते नेहमीचे भगर, साबुदाण असे पदार्थ खाण्यापेक्षा ही एक वेगळी रेसिपी करून पाहा...(upavasachi idli recipe in Marathi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2024 05:10 PM2024-07-15T17:10:54+5:302024-07-15T19:05:45+5:30

Ashadhi Ekadashi Special Farali Idli: आषाढी एकादशीच्या दिवशी तेच ते नेहमीचे भगर, साबुदाण असे पदार्थ खाण्यापेक्षा ही एक वेगळी रेसिपी करून पाहा...(upavasachi idli recipe in Marathi)

Ashadhi Ekadashi upvaas idli recipe, how to make idli for fast, idli using sabudana and bhagar, upavasachi idli recipe in marathi | आषाढी एकादशी स्पेशल : करा उपवासाची इडली- मऊ लुसुलुशीत इडली करा झटपट-पावसाळ्यात पचायलाही हलकी

आषाढी एकादशी स्पेशल : करा उपवासाची इडली- मऊ लुसुलुशीत इडली करा झटपट-पावसाळ्यात पचायलाही हलकी

Highlightsउपवासाच्या दिवशी तुमची आवडीची इडली आणि चटणी खायला मिळाली तर क्या बात !!

आषाढी एकादशी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या दिवशी घरातले जवळपास सगळेच जण उपवास करत असतात. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ करण्याचा उत्साह येतो. आता उपवासाला कोणते कोणते पदार्थ करायचे, याची तयारी घरांघरांत सुरू झालेली असणारच (ashadhi Ekadashi Special Farali Idli). त्या तुमच्या पदार्थांच्या यादीत सकाळी नाश्त्याला उपवासाची इडली हा एक पदार्थ आताच लिहून ठेवा..(how to make idli for fast) उपवासाच्या दिवशी तुमची आवडीची इडली आणि चटणी खायला मिळाली तर क्या बात (idli using sabudana and bhagar)... म्हणूनच लगेचच बघा अगदी सोप्या पद्धतीने उपवासाची इडली करण्याची एक अतिशय सोपी रेसिपी. (upavasachi idli recipe in marathi)

 

उपवासाची इडली करण्याची रेसिपी

साहित्य

१ कप भगर

पाव कप साबुदाणा

बघा आलिया भटने नेसलेली चांदीचे काठ- सोन्याची बुटी असणारी १६० वर्षे जुनी 'आशावाली' साडी.. 

१ टीस्पून खाण्याचा सोडा

१ कप दही 

चवीनुसार मीठ

 

कृती

सगळ्यात आधी एका भांड्यात १ कप भगर आणि पाव कप साबुदाणा घ्या. २ ते ३ वेळा हे पदार्थ स्वच्छ धुवून घ्या.

आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात गोकर्णाचं निळंशार पाणी पिण्याचे ६ फायदे, बघा कसा करायचा गोकर्णाचा वापर

त्यानंतर त्यामध्ये पाणी टाका आणि कमीतकमी ४ तास किंवा रात्रभर हे पदार्थ पाण्यात भिजू द्या.

भगर आणि साबुदाणा पाण्यात चांगले भिजले की मग भांड्यातलं सगळं पाणी काढून टाका आणि ते दोन्ही पदार्थ मिक्सरमध्ये टाकून चांगले वाटून घ्या. मिक्सरमधून ते वाटतानाच त्यामध्ये दही टाका. दह्याच्या ऐवजी ताकाचा वापरही करू शकता.

 

आता वाटून घेतलेली पीठ एका भांड्यात काढा. त्यात चवीनुसार मीठ आणि सोडा टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. आता नेहमीप्रमाणे या पिठाच्या इडल्या लावा. 

ना त्वचा टॅन होणार ना डेडस्किन वाढणार! अंघोळीच्या वेळी फक्त १ उपाय करा, त्वचा चमकेल

हे पीठ खूप पातळ किंवा घट्ट करू नका. तुम्ही नेहमी ज्या पद्धतीने इडलीसाठी पीठ तयार करता, तसंच पीठ करा. छान मऊ, लुसलुशीत इडल्या उपवासाच्या दिवशी नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट आहेत. 

 

Web Title: Ashadhi Ekadashi upvaas idli recipe, how to make idli for fast, idli using sabudana and bhagar, upavasachi idli recipe in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.