Lokmat Sakhi >Food > हिवाळ्यात खा कणकेचे पौष्टिक लाडू, पंजाबी पिन्नीचा पाहा भन्नाट प्रकार, लाडू टिकतील महिनाभर

हिवाळ्यात खा कणकेचे पौष्टिक लाडू, पंजाबी पिन्नीचा पाहा भन्नाट प्रकार, लाडू टिकतील महिनाभर

Atte Ki Pinni Laddu - Healthy Winter Ladoo for Strong Bones & Muscle : सुकामेव्याचे लाडू थंडीत खातोच पण पोषण गव्हाच्या पिठाच्या लाडवातही भरपूर आहे, पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2023 02:49 PM2023-12-15T14:49:07+5:302023-12-15T14:50:00+5:30

Atte Ki Pinni Laddu - Healthy Winter Ladoo for Strong Bones & Muscle : सुकामेव्याचे लाडू थंडीत खातोच पण पोषण गव्हाच्या पिठाच्या लाडवातही भरपूर आहे, पाहा रेसिपी

Atte Ki Pinni Laddu - Healthy Winter Ladoo for Strong Bones & Muscle | हिवाळ्यात खा कणकेचे पौष्टिक लाडू, पंजाबी पिन्नीचा पाहा भन्नाट प्रकार, लाडू टिकतील महिनाभर

हिवाळ्यात खा कणकेचे पौष्टिक लाडू, पंजाबी पिन्नीचा पाहा भन्नाट प्रकार, लाडू टिकतील महिनाभर

थंडीचे दिवस सुरु झाल्यानंतर त्याचे सकारात्मक आणि दुष्परिणाम दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. मुख्य म्हणजे थंडीमुळे बऱ्याच शारीरिक व्याधी निर्माण होतात. या दिवसात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या वाढतात. शिवाय हाडं ठणकणे, कंबर-पाठदुखी, यामुळे लोकं बेजार होतात. जर आपण देखील या त्रासाला कंटाळलले असाल तर, रोज एक गव्हाच्या पिठाचे पौष्टीक लाडू (Wheat Flour Laddoo) खा. हे लाडू आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. शिवाय झटपटही तयार होतात.

हिवाळ्यात आपण मेथी, ड्रायफ्रुट्स किंवा डिंकाचे लाडू करतोच, पण यंदा गव्हाच्या पिठाचे पौष्टीक लाडू करून पाहा (Cooking Tips). काही वेळेला गव्हाच्या पिठाचे लाडू फसतात, चिकट होतात किंवा लाडू करतानाचे प्रमाण चुकते. जर परफेक्ट लाडू तयार करायचे असतील तर, ही रेसिपी नक्कीच करून पाहा(Atte Ki Pinni Laddu - Healthy Winter Laddoo for Strong Bones & Muscle).

गव्हाच्या पिठाचे पौष्टीक लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

तूप

बदाम

काजू

खजूर

सुकं खोबरं

कडू मेथी कशी ओळखावी? कोथिंबीर जास्त काळ फ्रेश ठेवण्यासाठी काय करावे? पाहा निवडण्याची सोपी ट्रिक

बेसन

गव्हाचं पीठ

डिंकाची पावडर

मनुके

पांढरे तीळ

खसखस

आलं पावडर

वेलची पूड

गुळ पावडर

कृती

सर्वप्रथम, पॅनमध्ये दोन चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात कपभर बदाम, काजू आणि सुके खजूर घालून भाजून घ्या. भाजलेला सुकामेवा एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात सुकं खोबऱ्याचे तुकडे घालून मिक्स करा. सुकामेवा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, व त्याची जाडसर पावडर तयार करून घ्या.

कोवळ्या-हिरव्यागार मेथीचे करा खमंग ‘मेथी मुटके!’ मुलांच्या डब्यासाठी खुसखुशीत पौष्टिक पदार्थ, झटपट रेसिपी

नंतर पॅनमध्ये ३ चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात अर्धा कप बेसन घालून भाजून घ्या. जोपर्यंत बेसन तुपात मिक्स होत नाही, तोपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात दीड कप गव्हाचं पीठ आणि ३ चमचे तूप घालून मध्यम आचेवर भाजून घ्या. पीठ तुपात मिक्स झाल्यानंतर त्यात २ चमचे तूप, ३ टेबलस्पून डिंकाची पावडर आणि मनुके घालून मिक्स करा. तयार मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात २ चमचे भाजलेले पांढरे तीळ, २ टेबलस्पून खसखस, अर्धा चमचा आलं पावडर, अर्धा चमचा वेलची पूड, सुकामेव्याची भरड आणि एक कप गुळ पावडर घालून मिक्स करा.

साहित्य एकजीव झाल्यानंतर हाताला थोडे तूप लावा, मिश्रण हातावर घेऊन लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे गव्हाच्या पिठाचे पौष्टीक लाडू खाण्यासाठी रेडी. हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवल्यास हे लाडू महिनाभर आरामात टिकतील.

Web Title: Atte Ki Pinni Laddu - Healthy Winter Ladoo for Strong Bones & Muscle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.