गावाकडे जर भाजी नसेल तर, भाजीला उत्तम पर्याय म्हणून भाकरीसोबत खर्डा खाल्ला जातो. भाकरी, हाताने ठेचलेला कांदा, त्यासोबत खर्डा खायला खूपच भारी लागतो. खर्डा खाल्ल्याने जिभेला एक वेगळीच झणझणीत चव मिळते. याची चव बराच वेळ जिभेवर रेंगाळत राहते. महाराष्ट्रातील प्रत्येक भागात खर्डा केला जातो. या पदार्थाला काही ठिकाणी खर्डा तर काही ठिकाणी मिरचीचा ठेचा म्हटले जाते.
मिरची, शेंगदाणे, लसूण या साहित्यांचा वापर करून खर्डा तयार केला जातो. जर आपल्याला देखील गावकडच्या पद्धतीने खर्डा तयार करायचा असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. कमी साहित्यात - कमी वेळात हा झणझणीत पदार्थ रेडी होतो. यासह साठवून ठेवल्यास २ - ३ महिने आरामात टिकतो. चला तर मग या पावसाळ्यात जेवताना तोंडी लावण्यासाठी झणझणीत खर्डा ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहणार ना(Authentic Gavran Zanzanit Kharda Recipe, ready in 10 minutes)..
खर्डा करण्यासाठी लागणारं साहित्य
८ - १० मिरच्या
शेंगदाणे
लसूण
जिरं
नाश्त्याला करा इन्स्टंट रवा ढोकळा, गुजराथी रेसिपी करायला सोपी - पोटभर आणि पौष्टिक
तेल
मीठ
कोथिंबीर
कृती
सर्वप्रथम, तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यात अर्धा कप शेंगदाणे घालून भाजून घ्या. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका वाटीत काढून घ्या. त्याच तव्यावर एक चमचा तेल घाला, व त्यात देठ काढलेल्या मिरच्या व लसणाच्या पाकळ्या घालून भाजून घ्या. मिरच्या व लसणाच्या पाकळ्या भाजून झाल्यानंतर त्यात जिरं घालून भाजून भाजून घ्या, व हे साहित्य एका खलबत्यात काढून घ्या. मिरच्या थंड झाल्यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे घालून खर्डा ठेचून घ्या.
करा पुदिना चटणी, चमचमीत चव आणि करायला खूप सोपी - जेवण होईल मस्त
दुसरीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा तेल घाला, तेल गरम झाल्यानंतर त्यात ठेचलेला खर्डा, मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतवून घ्या. व हवाबंद डब्यात खर्डा साठवून ठेवा. अशा प्रकारे झणझणीत खर्डा खाण्यासाठी रेडी.