दिवाळी म्हटली की चिवडा, चकली, शंकरपाळी, करंज्या आणि लाडू हे प्रकार आवर्जून केले जातात. पण कडबोळी, चाफेकळी किंवा चिरोटे हे थोडेसे अवघड पण पारंपरीक प्रकार घरात केले जातातच असे नाही. मात्र खायला अतिशय चविष्ट लागणारे हे पदार्थ यंदा तुम्ही ट्राय करुन पाहू शकता. कडबोळी म्हणजे चकलीची बहिण असे आपण म्हणू शकतो. कारण भाजणीपासूनच केली जाणारी ही कडबोळी चकलीप्रमाणेच अतिशय चविष्ट लागतात. पूर्वी कडबोळी अठरा धान्यांच्या भाजणीपासून केली जात असत. मात्र आता घरच्या घरी उपलब्ध होतील आणि कमीत कमी साहित्यातही तुम्ही कडबोळी बनवू शकता (Authentic Kadboli Recipe Diwali Faral Special).
दिवाळीमध्ये तर काही घरी आवर्जून क़डबोळी केली जातात. पण एरवीही अगदी दह्यासोबत किंवा अगदी चहासोबतही ही कडबोळी स्नॅक्स म्हणून छान लागतात. तुम्ही कडबोळी ट्राय केली नसतील तर तुमच्यासाठी काही सोप्या रेसिपी पाहूयात. कडबोळीला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही आकार देऊ शकता, त्यामुळे हे काम त्या तुलनेत सोपे असते. पण या पदार्थांची सगळी मजा असते ती भाजणीच्या पिठात. त्यामुळे कडबोळीची भाजणी भाजताना काय काळजी घ्यायची, याचे पीठ मळताना त्यात काय काय घालायचे अशा एक ना अनेक गोष्टींची गणितं जमावी लागतात.
कडबोळी खूप जास्त कडक झाली तरी ती खाता येत नाहीत आणि तळल्यावर मऊ पडली तरी त्यात मजा येत नाही. त्यामुळेच परफेक्ट पारंपरीक कडबोळी करायची असतील तर काय करायला हवे याविषयी समजून घेणे गरजेचे आहे. सध्या युट्यूबवर त्याबाबतचे बरेच व्हिडिओ अगदी सहज पाहायला मिळत असल्याने त्याच्या आधारे आपण हा पदार्थ नक्कीच छान करु शकतो. भाजणीशिवाय ज्वारीच्या पिठाची, तांदळाच्या पिठाची किंवा अगदी मूग डाळीची कडबोळीही करता येतात.