Join us  

घावन करायला जावं तर ते तव्याला चिकटतं? उलटताना तुटतं? पाहा पारंपरिक कोकणी घावन रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2024 1:55 PM

Authentic konkani Ghavne/neer dosa : पीठ -मीठ -पाणी आणि ५ मिनिटात करा जाळीदार घावण..

घावणे हा पदार्थ महाराष्ट्रातील फेमस डिश आहे. खासकरून कोकण भागात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. घावणे हा पदार्थ तांदळाच्या पिठाचा वापर करून तयार केला जातो. त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी अप्रतिम लागते. घावणे तसा पौष्टीक पदार्थ, नाश्त्याला २ ते ३ घावणे खाल्ल्याने पोट टम्म भरते (Cooking Tips). बऱ्याचदा नियमित चपाती आणि भाकरी खाल्ल्याने कंटाळा येतो.

जर आपल्यला चपाती-भाकरी व्यक्तिरिक्त काहीतरी पौष्टीक आणि हटके खायचं असेल तर, एकदा घावणे ही रेसिपी करून पाहा (Ghavne). तांदुळाच्या पिठाची ही हटके रेसिपी वाटते तितकी सोपी नाही. अचूक प्रमाणाच्या साहित्यांचा वापर केल्यास घावणे जाळीदार मऊ लुसलुशीत तयार होतात(Authentic konkani Ghavne/neer dosa ).

घावणे करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदुळाचं पीठ

मीठ

दाबेलीत भरायचे सारण जमत नाही? घ्या कच्छी दाबेली करण्याची रेसिपी - सारण जमेल परफेक्ट

पाणी

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप तांदुळाचं पीठ घ्या. तांदुळाचं पीठ दळून आणल्यास घावणे कोकणी पद्धतीप्रमाणे तयार होतील. एक कप तांदुळाच्या पिठात चवीनुसार मीठ आणि दीड कप पाणी ओतून मिक्स करा. पाण्याचे प्रमाण कळल्यानंतर घावणे जाळीदार तयार होतात. पण जास्त पाणी घालू नये. यामुळे घावणे तव्यला चिकटतात.

घरातला लसूण संपला? ऐनवेळी लसणाऐवजी वापरा ३ गोष्टी, पदार्थ होईल रुचकर

आता लोखंडी तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. गॅस हाय फ्लेमवर ठेवा. तवा कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा कांदा चिरा, व तेलात बुडवून तव्याला तेल लावा. एका छोट्या वाटीने बॅटर ढवळा, व वाटीभर बॅटर तव्यावर ओता. त्यावर झाकण ठेऊन १० ते १५ सेकंद वाफ द्या. १५ सेकंद झाल्यानंतर झाकण काढून गॅस मध्यम आचेवर करून घावण पलटी करा, व दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे मऊ - लुसलुशीत जाळीदार घावणे खाण्यासाठी रेडी. आपण गरमागरम घावणे खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स