Join us  

घाई गडबडीच्यावेळी अगदी कमी साहित्यात नाश्त्याला करा कुरकुरीत गोड आप्पे, पाहा सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2024 3:36 PM

Authentic Sweet Appe Recipe : आप्पे अनेक प्रकारे करता येतात, त्यापैकी गोड कुरकुरीत आप्पे करण्याची सोपी रेसिपी..

सकाळी नाश्त्यासाठी गरमागरम आप्पे आणि ओल्या नारळाची चटणी समोर आली की, मनसोक्त अगदी पोटभर हा नाश्ता करावासा वाटतो. आप्पे हा खरं तर दाक्षिणात्य पदार्थ आहे, परंतु हा पदार्थ आता इतका फेमस झाला आहे की आजकाल सगळ्यांच्या घरात आप्पे बनवले जातात. सकाळच्या नाश्त्याला आपण वेगवेगळे पदार्थ खाणे पसंत करतो. उपमा, पोहे, इडली, मेदुवडा असे नाश्त्याचे अनेक प्रकार आपण खातो. परंतु आपण रोज तेच ते नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळतो. अशावेळी काहीतरी वेगळं खावंसं वाटत. काहीवेळा आपल्याला सकाळच्या नाश्त्याला काहीतरी गोड खावंसं वाटत तेव्हा आपण शिरा, मालपोआ असे अनेक पदार्थ बनवतो. याचबरोबर सगळ्यांच्या घरात नाश्त्याला हमखास केला जाणारा एक पदार्थ म्हणजे आप्पे(Instant Sweet Appam Recipe).

आप्पे हे वेगवेगळ्या पद्धतींनी बनवता येतात. काहीवेळा आपण तिखट किंवा गोड तसेच भाज्यांचे स्टफिंग घालून किंवा मिश्र डाळींचे आप्पे बनवतो. एकाच  पद्धतीचे बॅटर वापरून आपण अनेक प्रकारचे आप्पे अगदी सहज बनवू शकतो. आप्पे कोणतेही असोत त्याची चव जिभेवर रेंगाळत राहतेच. आप्पे अनेक प्रकारे करता येतात त्यापैकी गोड कुरकुरीत आप्पे खाण्याची मज्जा काही औरच असते. गोड, कुरकुरीत आप्पे कसे करायचे याची सोपी रेसिपी पाहूयात(how to make Authentic Sweet Appe at home).

साहित्य :- 

१. बारीक रवा - १ कप २. साखर किंवा गूळ - १/२ कप ३. दही - १/४ कप ४. दूध - १ कप ५. ओलं खोबरं - १/२ कप ६. वेलची पावडर - १/२ टेबलस्पून७. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून  ८. तूप - गरजेनुसार ९. खसखस - १/२ टेबलस्पून 

पावसाळ्यात खमंग दालवडा खायचाय? घ्या अहमदाबादी दालवडा स्पेशल रेसिपी, मस्त चमचमीत-खुसखुशीत पदार्थ...

डब्यात ठेवलेल्या चपात्या वाफेने भिजून ओल्या होतात ? ५ सोप्या ट्रिक्स, चपाती सादळणार नाही...

कृती :- 

१. एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक रवा घेऊन त्यात साखर किंवा गूळ आपल्या आवडीनुसार घालावा. २. त्यानंतर त्यात दही व दूध घालावे. ३. आता हे सगळे मिश्रण चमच्याने व्यवस्थित ढळवून घ्यावे त्यानंतर या बाऊलवर झाकणी ठेवून २० मिनिटांसाठी पीठ सेट होण्यासाठी तसेच ठेवून द्यावे. 

मस्त बरसणाऱ्या पावसात करा गरमागरम पनीर पॉपकॉर्न! शनिवार-रविवारसाठी स्पेशल चमचमीत, विकेंड झक्कास!

४. २० मिनिटांनंतर पीठ व्यवस्थित सेट झाल्यावर त्यात ओलं खोबरं, बेकिंग सोडा, वेलची पावडर घालून हे सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे. ५. त्यानंतर आप्पे पात्राच्या भांड्यात थोडे तूप घालून मग त्यावर थोडेसे खसखस घालून तयार मिश्रण आप्पे पात्रात चमच्याने सोडावे. ६. आप्पे पात्राच्या वर झाकणी ठेवून १० मिनिटे ते आप्पे व्यवस्थित खरपूस भाजून घ्यावे. 

गोड - कुरकुरीत आप्पे खाण्यासाठी तयार आहेत.

टॅग्स :अन्नपाककृतीकिचन टिप्स