Join us  

प्रेशर कुकरमध्ये करा १ वाटी तांदळाचा पारंपरिक मसाले भात, अगदी लग्नात करतात तसा परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2024 10:00 AM

Authentic & Traditional Masale Bhat Recipe - New Simple Tips : चमचमीत मसाले भात करण्याची पाहा सोपी कृती

पूर्वी लग्नाचा मेन्यू म्हटलं की मसाले भात हमखास असायचा (Masale Bhat). पण आजकाल घरात सणवार आल्यानंतर मसाले भात आवर्जुन केले जाते. भात सगळ्यांना आवडतो (Cooking Tips). त्यात जर मसाले भात असेल तर, विचारायलाच नको. भूक चाळवणारा मसाले भात सगळ्यांना हवाहवासा वाटतो (Food). पण घरात हॉटेलस्टाईल मसाले भात तयार होत नाही.

मसाल्यांचे प्रमाण चुकते किंवा साहित्याचे गणित चुकते. जर आपल्याकडूनही मसाले भात व्यवस्थित होत नाही, भाताचा गिचका होत असेल तर, या टिप्स फॉलो करून पाहा. हॉटेलस्टाईल मसाले भात होईल काही मिनिटात, अगदी परफेक्ट आणि चविष्ट. मसालेभात करण्याची सोपी आणि परफेक्ट पद्धत कोणती? पाहूयात(Authentic & Traditional Masale Bhat Recipe - New Simple Tips).

मसाले भात करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदूळ

मोहरी

जिरं

पुरीमध्ये तेल राहतं? टम्म फुलत नाही-मऊ पडतात? ४ टिप्स; पुऱ्या अजिबात तेलकट होणार नाहीत..

लवंग

दालचिनी

आलं - लसूण - हिरवी मिरचीची पेस्ट

हिरवे मटार

तोंडली

काजू

लाल तिखट

गरम मसाला

हळद

हिंग

गोडा मसाला

ओलं खोबरं

कोथिंबीर

पाणी

मीठ

कृती

सर्वात आधी प्रेशर कुकरमध्ये २ चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, जिरं, तमालपत्र, लवंग, दालचिनी, आलं - लसूण - हिरवी मिरची पेस्ट घालून मसाले भाजून घ्या. नंतर त्यात एक वाटी हिरवे मटार, तोंडली, एक वाटी काजू घालून भाज्या भाजून घ्या.

कायम हिमोग्लोबिन कमी होतं, अंगात रक्त कमी? ’हे’ ४ पदार्थ खाणं करा बंद-आयर्न होते कमी

एका बाऊलमध्ये एक चमचा धणे पूड, गरम मसाला, लाल तिखट, हळद, हिंग आणि गोडा मसाला घालून मिक्स करा. तयार मसाला भाज्यांमध्ये घाला. नंतर त्यात चवीनुसार मीठ, एक वाटी तांदूळ, किसलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. एक ग्लास पाणी घाला. शेवटी एक चमचा तूप घालून प्रेशर कुकरचं झाकण लावा. ३ शिट्ट्यानंतर गॅस बंद करा. अशा प्रकारे मसाले भात खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स