Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात फ्रिजमधलं 'कोल्ड' पाणी नको; प्या माठातलं 'गार' पाणी.. माठातलं पाणी पिण्याचे 8 फायदे

उन्हाळ्यात फ्रिजमधलं 'कोल्ड' पाणी नको; प्या माठातलं 'गार' पाणी.. माठातलं पाणी पिण्याचे 8 फायदे

 उन्हाळ्यात फ्रिजमधल्या 'कोल्ड' पाण्यापेक्षा माठातलं 'थंडगार' पाणीच बेस्ट.. माठातलं पाणी पिण्याचे फायदे अनेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 01:56 PM2022-04-25T13:56:16+5:302022-04-25T14:02:38+5:30

 उन्हाळ्यात फ्रिजमधल्या 'कोल्ड' पाण्यापेक्षा माठातलं 'थंडगार' पाणीच बेस्ट.. माठातलं पाणी पिण्याचे फायदे अनेक

Avoid 'cold' water from the fridge in summer; Clay pot's natural cold water gives 8 benefits | उन्हाळ्यात फ्रिजमधलं 'कोल्ड' पाणी नको; प्या माठातलं 'गार' पाणी.. माठातलं पाणी पिण्याचे 8 फायदे

उन्हाळ्यात फ्रिजमधलं 'कोल्ड' पाणी नको; प्या माठातलं 'गार' पाणी.. माठातलं पाणी पिण्याचे 8 फायदे

Highlightsमाठातल्या पाण्यानं शरीरास मातीचे गुणधर्म मिळतात.माठातलं पाणी पिल्यानं डिहायड्रेशनचा धोका टळतो.माठातलं नैसर्गिक गार पाणी पिल्यानं पचनाच्या समस्या निर्माण होत नाही.

उन्हाळ्यात खूप तहान लागते. थंड पाण्यानं तहान भागेल म्हणूअ फ्रिजमधलं पाणी प्यायलं जात. पण फ्रिजमध्यल्या पाण्यानं तात्पुरती तहान भागत असली तरी ते पाणी पिऊन आरोग्याचं नुकसानच होतं. फ्रिजमध्ये ठेवलेलं पाणी कृत्रिमरित्या गार होतं. त्यामुळे त्याचे तोटे होतात. फ्रिजमधलं थंड पाणी प्याल्याने आतड्यांवर परिणाम होतो. आतडे आंकुचन पावतात त्यामुळे आतडे आपलं काम नीट करु शकत नाही. पोट साफ होत नाही. फ्रिजमधल्या पाण्यानं बध्दकोष्ठता होते. पचन बिघडतं. पेशी आंकुचित पावून चयापचय बिघडतं. सतत फ्रिजमधलं थंड पाणी प्याल्यानं वजनही वाढतं. हानिकारक अशा फ्रिजमधल्या पाण्यापेक्षा माठातलं थंड पाणी प्यायला हवं. माठातल्या थंड पाण्यानं मातीचे गुणधर्म आपल्या शरीरात जातात. मातीचे गुणधर्म रोगांशी लढण्याची ताकद देतात. माठातल्या पाण्यात असलेल्या खनिजांमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. माठात नैसर्गिकरित्या गार होणाऱ्या पाण्यामुळे  तहान तर भागतेच पण आरोग्यासही फायदे होतात.

Image: Google

माठातलं पाणी का प्यावं?

1. माठातलं गार पाणी प्यायल्यानं उन्हाळी लागण्याचा धोका टळतो. माठातल्या पाण्यानं पाण्यातील जीवनसत्व आणि खनिजं यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहाते. शरीराला पुरेस्ं ग्लुकोज मिळाल्यानं शरीराला थंडावा मिळतो. 

2. माठातल्या पाण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.  शरीरातील टेस्टोस्टेराॅनची पातळी वाढते.

3. तहान लागली म्हणून फ्रिजमधलं पाणी प्याल्यानं घशातल्या पेशींचं तापमान कमी होतं. त्यामुळे घशातील ग्रंथींना सूज येते.  घसा बसतो. फ्रिजमधल्या पाण्यानं घशाचं होणारं नुकसान टाळण्यासाठी माठातलं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. माठातल्या पाण्यानं घशावर वाईट परिणाम होत नाही. 

4. माठातलं नैसर्गिक गार पाणी प्याल्यानं पोटात गॅस होण्याच्या समस्या निर्माण होत नाही. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी फ्रिजमधलं पाणी टाळून माठातलंच पाणी प्यायला हवं. माठातलं पाणी चविष्ट लागतं. माठातलं पाणी चविष्ट असल्यानं जास्तही प्यालं जातं. शरीरात पाण्याची कमतरता  निर्माण होत नाही. 

5. माठातल्या पाण्यानं रक्तदाब नियंत्रित राहातो. माठातलं पाणी पिल्यानं शरीरातील बॅड कोलेस्टेराॅल कमी होतं.  हदयविकाराचा धोका कमी होतो. 

6. मातीमध्य सूज आणि दाहविरोधी गुणधर्म असतात. मातीच्या या गुणधर्मामुळेच माठातलं पाणी प्याल्यानं शरीराच्या वेदना, स्नायुला आलेला आखडलेपणा, सूज कमी होते. संधिवातासारख्या त्रासात माठातलं पाणी प्याल्यानं आराम मिळतो. 

7. शरीरातील लोहाची कमतरता असल्यास ॲनेमिया होण्याचा धोका असतो. माठातलं पाणी प्याल्यानं शरीरात लोह जातं. लोहाची कमतरता दूर होते. 

8. त्वचेशी निगडित आजार असलेल्यांनी माठातलं पाणी अवश्य प्यावं. माठातलं पाणी प्याल्यानं चेहऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या, फोड येत नाही. त्वचा उजळ होते. 

Web Title: Avoid 'cold' water from the fridge in summer; Clay pot's natural cold water gives 8 benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.