प्रेशर कुकरमध्ये कोणताही पदार्थ झटपट तयार होतो (Pressure Cooker). तांदूळ, डाळ, यासह भाज्या प्रेशर कुकरमध्ये झटपट तयार होतात. यामुळे वेळ, गॅस आणि मेहनतही जास्त लागत नाही (Kitchen Hacks). पण प्रेशर कुकरमध्ये कोणते पदार्थ शिजत घालावे? कोणते पदार्थ शिजत घालू नये? याची माहिती असणे गरजेचं आहे (Kitchen Tips). कारण काही पदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजत घातल्याने त्यातील पौष्टीक घटक कमी होतात. जे आरोग्याच्या दृष्टीकोनातून हानिकारक ठरू शकते.
यासंदर्भात डॉ. संजय सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, 'प्रेशर कुकर हा स्वयंपाकघरातील अत्यंत उपयोगी वस्तू आहे. पण यात काही प्रकारचे असे पदार्थ आहेत जे कुकरमध्ये बनवण्याऐवजी इतर पद्धतीने बनवणे अधिक योग्य ठरू शकते'(Avoid cooking these dishes in a pressure cooker).
बटाटा
प्रेशर कुकरमध्ये बटाटे शिजवणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. प्रेशर कुकरच्या उच्च उष्णतेमुळे बटाट्यांमधील नैसर्गिक शर्करा जास्त गरम होते, ज्यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात. उकडलेल्या बटाट्यामध्ये जास्त प्रमाणात अँटी न्यूट्रिएंट्स असतात ज्यामुळे शरीराला योग्य पोषक तत्व मिळत नाहीत.
वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..
तांदूळ
साधारणपणे बहुतांश लोकांच्या घरात प्रेशर कुकरमध्ये भात तयार केला जातो. पण प्रेशर कुकरमध्ये भात शिजत घालणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. कुकरमध्ये भात शिजवताना स्टार्च ऍक्रिलामाइड नावाचे रसायन बाहेर पडते, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
पालक
प्रेशर कुकरमध्ये पालकाची भाजी करू नका. यामुळे त्यातील ऑक्सॅलेट्स जास्त प्रमाणात विरघळतात, ज्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो. पालक प्रेशर कुकरमध्ये शिजवण्याऐवजी, कोणत्याही इतर भांड्यात शिजत घाला. शिवाय पालक शिजत घालताना त्यात पाणी जास्त प्रमाणात घाला. जेणेकरून त्यातील पोषक घटक सुरक्षित राहतील.
अक्षय कुमार उठल्यानंतर करतो १ 'खास' काम; पन्नाशीतही तंदुरुस्त राहायचं असेल तर..
भाज्या
भाज्या शक्यतो कोणत्याही इतर भांड्यात शिजत घालावे. प्रेशर कुकरमध्ये भाज्या शिजवल्याने त्यातील सर्व पोषक घटक नष्ट होतात. हे त्याच्या उच्च तापमानामुळे होते. यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.