Lokmat Sakhi >Food > आंबा खाल्ल्यावर लगेच खाऊ नयेत असे ५ पदार्थ, बिघडेल पोट-सांभाळा....

आंबा खाल्ल्यावर लगेच खाऊ नयेत असे ५ पदार्थ, बिघडेल पोट-सांभाळा....

5 Foods You Must Avoid After Consuming Mango : आंबा खाल्ला की लगेच काही पदार्थ खाणे टाळले तर ते पोटाला बरे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 06:54 PM2023-05-22T18:54:51+5:302023-05-22T19:15:01+5:30

5 Foods You Must Avoid After Consuming Mango : आंबा खाल्ला की लगेच काही पदार्थ खाणे टाळले तर ते पोटाला बरे.

Avoid Eating These 5 Foods Right After Consuming Mangoes | आंबा खाल्ल्यावर लगेच खाऊ नयेत असे ५ पदार्थ, बिघडेल पोट-सांभाळा....

आंबा खाल्ल्यावर लगेच खाऊ नयेत असे ५ पदार्थ, बिघडेल पोट-सांभाळा....

उन्हाळ्याच्या ऋतुमध्ये येणारे सर्वात चांगले आणि सगळ्यांच्या आवडते फळ म्हणजे आंबा. आंबा (Mango) हे प्रत्येकाला आवडणारं फळ आहे. उन्हाळ्याच्या हंगामात म्हणजेच मे महिना सुरू झाला की बाजारात आंबे उपलब्ध होतात. आंबे चवीने उत्तम असतातच शिवाय आरोग्यासाठी (Health tips) देखील अतिशय उपयुक्त असतात. अनेक जण जेवणासोबत आंबा (Mangoes with meals) खातात , तर काहींना तसाच आंब्यांवर ताव मारायला (Eating mangoes ) आवडतो. मात्र, आंबा खाल्यानंतर काही पदार्थ खाणं टाळणं आरोग्यासाठी गरजेचं असतं. आंबा खाल्यानंतर काही पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक (Mango can be harmful) ठरू शकतं.

उन्हाळा ऋतू कोणालाच आवडत नाही आणि यामुळे लोक हैराण असतात पण तरीही वर्षभर ते या ऋतूची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण अर्थातच आंब्याची ओढ असते. आंब्यासाठी कितीही खर्च करावा लागला तरी लोक तो खाणे काही सोडत नाहीत. लोक आंब्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवतात आणि खातात. अर्थात त्याची चव अप्रतिम असू शकते. पण आंबा खाण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. आंब्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसह फायबर, खनिजे (minerals) आणि जीवनसत्त्वे (vitamins) भरपूर असतात. पण त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. पब्लिक हेल्थ रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, जेव्हा आंबा खाल्ल्यानंतर लगेच आपण काहीतरी चुकीचे पदार्थ खातो तेव्हा त्याचे विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतात(Avoid Eating These 5 Foods Right After Consuming Mangoes).

आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत असे काही पदार्थ... 

१. पाणी :- अनेकांना आंबा खाल्यानंतर पाणी (Water) पिण्याची सवय असते. मात्र, आंबा खाल्यानंतर कधीच लगेचच पाणी पिऊ नये. असे केल्यास आपल्या  आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतो. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे महागात पडू शकते. आंबा खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये पोटदुखी, अपचन, पोट फुगणे, ॲसिडिटी यांसारख्या समस्यांचा समावेश होतो. हे टाळण्यासाठी आंबा खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नये.  

आंब्याच्या फोडी कापून ठेवल्यानंतर लगेच काळ्या पडतात ? ४ सोप्या ट्रिक्स, आंब्याचा अस्सल केशरी रंग टिकून राहील...

२. दही :- आपण दही आणि आंबा कोणत्याही प्रकारे खात असाल तर ते चुकीचे आहे. आंब्यासोबत किंवा लगेच दही खाल्ल्याने आपल्या पोटाचे आणि त्वचेचे आरोग्य बिघडू शकते. आंबा गरम तर दही थंड असते. अशा स्थितीत दोन्हीच्या मिश्रणाचा आरोग्यावर वाईट परिणाम झालेला दिसून येतो. 

आंबा आणि साखर, दोनच गोष्टी वापरून करा परफेक्ट आंब्याचा जॅम, वर्षभर टिकेल...

३. कोल्ड ड्रिंक्स :- आंबा खाल्ल्यानंतर लगेच कोल्ड्रिंक्स पिऊ नये, कारण आंबा आणि कोल्ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. जे काही मिनिटांत तुमचे आरोग्य बिघडवू शकते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी तर आंबा खाल्ल्यानंतर लगेच त्यावर कोल्ड ड्रिंक्स पिऊ नये यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढण्याची शक्यता असते. 

४. कारलं :- आंबा खाल्ल्यानंतर लगेच कोणी कारले खात नाहीच, पण जर आपण असे करत असाल तर आपल्याला आरोग्यासंबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. आंबा खाल्ल्यानंतर कारले खाल्ल्याने पोटात ॲसिडिटी वाढते. अशा स्थितीत आपल्याला उलट्या, मळमळ आणि श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. 

प्या गारेगार कोकोनट मँगो मिल्कशेक, उन्हाळा सुसह्य करणारी रेसिपी - हॉटेलपेक्षा भारी चव...

५. मसालेदार पदार्थ :- आंबा खाल्ल्यानंतर त्यावर लगेच मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यास चेहऱ्यावर मोठेमोठे पिंपल्स येण्याची शक्यता असते. तर आंबा खाल्ल्यानंतर लगेच मसालेदार पदार्थ कधीच खाऊ नयेत. यामुळे पोटात उष्णता वाढते, जी नंतर चेहऱ्यावर मुरुमांच्या किंवा उबाळ्यांच्या रूपात दिसू शकते. आंबा मसालेदार पदार्थांसोबतही खाऊ नये. यामुळे लोकांना पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे पोट खराब होऊ शकते.

 

Web Title: Avoid Eating These 5 Foods Right After Consuming Mangoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न