Join us  

बहुतांश घरांमध्ये डाळ शिजवताना ३ चुका केल्या जातात, बघा तुमचंही काहीतरी चुकत आहे का....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2024 6:04 PM

Avoid These 3 Mistakes While Cooking Dal: कोणत्याही प्रकारची डाळ कशी शिजवायची, याविषयीची ही अतिशय महत्त्वाची माहिती स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकीने एकदा वाचायलाच पाहिजे....

ठळक मुद्देया चुका करणं टाळलं तर तुमचं रोजचंच वरण अधिक पौष्टिक आणि जास्त चवदार होईल, असं आहारतज्ज्ञ सांगतात...

डाळ हा रोजच्या स्वयंपाकातला अगदी महत्त्वाचा घटक. ज्या घरात मधुमेह असणारे, वेटलॉस करणारे, हृदयविकार असणारे लोक असतात, त्या घरात भात करत नाहीत. पण डाळ किंवा वरण मात्र हमखास करतात. तुरीचं, मुगाचं, उडीदाचं असं कोणतं ना कोणतं वरण बहुसंख्य घरांमध्ये अगदी रोज असतंच. वरणासाठी डाळ शिजविण्याच्या कामात मात्र अनेक जणींकडून काही चुका केल्या जातात (Avoid these 3 mistakes while cooking dal). या चुका करणं टाळलं तर तुमचं रोजचंच वरण अधिक पौष्टिक आणि जास्त चवदार होईल, असं आहारतज्ज्ञ सांगतात (Ayurvedic method for cooking dal). बघा डाळ शिजवताना नेमकं काय केलं पाहिजे... (How to make dal more healthy and more delicious)

डाळ शिजवताना ३ चुका टाळा

 

वरणासाठी डाळ शिजवताना आयुर्वेदानुसार कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या, याविषयीची महत्त्वाची माहिती artofliving या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

नाचणीच्या इडलीची पाहा सोपी-झटपट आणि चविष्ट रेसिपी, मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक पदार्थ-पोेषणही भरपूर

१. तुर, मुग, उडीद, मसूर यांपैकी कोणतीही डाळ शिजवायची असेल तर ती डाळ शिजविण्यापुर्वी कमीतकमी ४ तास भिजत घालावी. असं केल्याने डाळीतलं प्रोटीन पचायला सोपं जातं, डाळ अधिक चवदार होते आणि तिच्यातली पोषणमुल्ये वाढतात. जर उसळीसाठी मूग, चवळी, हरबरा भिजत घालत असाल तर ते कमीतकमी ६ तास भिजवावे. तर राजमा, वाटाणे यासारखी कडधान्ये कमीतकमी ८ तास भिजवावीत.

 

२. डाळ शिजवताना ती मातीच्या भांड्यात शिजवणं अधिक उत्तम. पण ते जर नसेल तर तांबे, स्टेनलेस स्टिल किंवा मग कास्ट आयर्न या धातूच्या भांड्यात डाळ शिजवावी.

हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? ६ फळं नियमित खा- अशक्तपणा कमी होऊन रक्तातील लाेह वाढेल

३. डाळ शिजविताना ती प्रेशर कुकरमध्ये न शिजवता भांड्यात शिजवा. डाळ शिजत असताना सुरुवातीला तिच्यावर फेस येईल. तो फेस काढून टाका आणि पुन्हा पाणी टाकून डाळ शिजवा. यामुळे युरिक ॲसिड वाढणे, किडनी स्टोन असा त्रास होणार नाही. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स