Join us  

Diwali : लाडू असो की वड्या, पाक हमखास चुकतो? ५ चुका टाळा-पाक कधीच बिघडणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 7:08 PM

Avoid These Mistakes While Making Chashni Or Sugar Syrup : 5 Mistakes To Avoid While Making Sugar Syrup : How to make Sugar syrup chashni for Indian Sweets : Sugar syrup for indian sweets : दिवाळीनिमित्त गोड पदार्थ करण्यासाठी पाक तयार करताना कोणत्या चुका टाळाव्यात, ते पाहू...

दिवाळीचा फराळ तयार करण्याची लगबग सध्या प्रत्येक घरात सुरु असेलच. फराळ करताना आपण गोड, तिखट अशा वेगवेगळ्या चवींचे पदार्थ करतो. फराळाचे गोड पदार्थ करताना काही पदार्थांसाठी गूळ किंवा साखरेचा पाक तयार करावा लागतो. रव्याचे लाडू, पाकातील अनारसे, बालूशाही, गुलाबजाम, रसगुल्ला  (5 Mistakes To Avoid While Making Sugar Syrup) असे पाकातील पदार्थ सणानिमित्त तयार केले जातात. पाकातील पदार्थ खाताना जर त्याचा पाक योग्य पद्धतीने तयार झाला असेल तरच असे पदार्थ चवीला चांगले लागतात. जर पाक व्यवस्थित तयार नाही झाला तर पदार्थ फसतो(Avoid These Mistakes While Making Chashni Or Sugar Syrup).

पाक तयार केल्यावर काहीवेळा तो खूपच पातळ होतो तर कधी खूपच चिकट आणि घट्ट होतो. यामुळेच अनेक गृहिणींना पाक तयार करणे म्हणजे खूपच किचकट आणि वेळखाऊ काम वाटते. कोणत्याही पदार्थांसाठी पाक तयार करायचा म्हटलं की तो एकतारी पाक (Sugar syrup for indian sweets) तयार झाला तरच तो पाक व्यवस्थित तयार झाला आहे असे मानले जाते. अशा परिस्थितीत, पाक तयार करताना आपण काही छोट्याशा चुका करतो, या चुकांमुळेच पाक बिघडतो. यासाठीच कोणत्याही गोड पदार्थासाठी पाक तयार करताना कोणत्या चुका टाळाव्यात ते पाहूयात(How to make Sugar syrup chashni for Indian Sweets).  

चूक १ :- पाक तयार करताना त्यात पाणी घालणे. 

शक्यतो पाक तयार करताना साखर आणि पाणी यांच्या योग्य प्रमाणावर विशेष लक्ष दिले जात नाही, यामुळेच पाक बिघडतो. पाक तयार करताना काहीजण साखरेत जास्त प्रमाणात पाणी घालून तासंतास तो पाक शिजवत बसतात. जास्त पाणी घालून पाक तासंतास उकळवल्याने त्याचा रंग गडद होऊन पाक दगडासारखा घट्ट होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे पाक तयार करताना साखर आणि पाणी यांचे प्रमाण हे एकमेकांना पूरक असे असले पाहिजे. 

यंदा दिवाळीत करा रतलामी शेव, घ्या परफेक्ट पारंपरिक रेसिपी - फराळाची वाढेल लज्जत...

चूक २ :- पाक तयार होताना कढईच्या कडांना लागलेला पाक व्यवस्थित स्वच्छ न करणे. 

पाक तयार होत असताना साखर आणि पाक एकत्रितपणे कढईच्या कडेवर चिकटून बसतात. अशाप्रकारे कढईच्या कडेवर लागलेली साखर आणि पाक वेळीच  चमच्याने काढून घ्यावा. असे न केल्यास कढईच्या कडेवर चिकटलेले साखरेचे बारीक खडे या पाकात मिसळतात. यामुळे पाक एकतारी न होता या पाकात साखरेचे खडे राहतात. साखरेचे खडे पाकात तसेच राहिल्याने खाताना ते दातांखाली येतात. याचबरोबर पाकाला एकसारखे स्मूद टेक्श्चर न येता तो खडबडीत, चरचरीत होतो. यासाठी पाक तयार करताना तो सतत चमच्याने हलवत राहावा आणि कढईच्या कडेला चिकटलेली साखर काढून घ्यावी.  

कोण म्हणते अनारसा करणे कठीण काम? ही घ्या झटपट अनारसे करण्याची कृती, खा जाळीदार अनारसे...

चूक ३ :- पाक सतत चमच्याने न हलवणे. 

पाक तयार करताना काहीजण साखर आणि पाणी एका भांड्यात घालून गॅसवर उकळवण्यासाठी तसेच ठेवून देतात. पाक तयार होताना जर तो सतत चमच्याने हलवत राहिले नाही तर पाक बिघडतो. यामुळे साखर पाण्यांत लगेच न विरघळल्याने साखरेचे खडे तसेच पाकात राहतात. याचबरोबर जर पाक चमच्याने ढवळत राहिले नाही तर तो करपून भांड्याच्या तळाशी चिकटू शकतो. यासाठी परफेक्ट एकतारी पाक तयार करण्यासाठी तो तयार करताना सतत चमच्याने ढवळत राहणे गरजेचे आहे. 

फ्रोझन करुन ठेवा आणि कधीही खा ‘या’ ६ भाज्या, आज भाजीला काय करु, प्रश्नही सुटेल!

चूक ४ :- पाक खूप जास्त वेळ उकळणे. 

पाक जास्त वेळ उकळू नये, कारण यामुळे त्याचा रंग आणि चव दोन्ही खराब होऊ शकते. जेव्हा साखरेचा पाक बनवता तेव्हा त्यात कमी पाणी घाला आणि साखर लवकर विरघळवून घ्या, थोडा वेळ शिजवा आणि नंतर गॅस बंद करा. जर पाक लवकर घट्ट होत असेल तर त्यात ३ ते ४ चमचे पाणी घालून पुन्हा गरम करा. पाणी न घालताच पाक गरम केल्याने तो अधिक जास्त घट्ट होऊ शकतो. 

ना भाजणीची धावपळ, ना तेलात चकली विरघळण्याचं टेंशन, १० मिनिटांत करा इन्स्टंट बटर चकली...

चूक ५ :- योग्य साखर आणि गूळ निवडणे. 

पाक न बिघडता तो परफेक्ट होण्यासाठी योग्य साखर आणि गूळ निवडणे देखील तितकेच महत्वाचे आहे. साखरेचा पाक तयार करण्यासाठी दाणेदार साखर आणि गाडद पिवळ्या रंगाच्या गुळाचा वापर करावा. लाडू, चिक्की बनवण्यासाठी बाजारांत खास वेगळा गूळ मिळतो तेव्हा लाडू, चिक्की तयार करण्यासाठी याच गुळाचा वापर करावा.

टॅग्स :दिवाळी 2024अन्नदिवाळीतील पूजा विधीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स