Lokmat Sakhi >Food > खाऊन तर पाहा आवळा आणि ओल्या हळदीचा आंबटगोड ठेचा, हिवाळ्यातल्या जेवणाची वाढते रंगत...

खाऊन तर पाहा आवळा आणि ओल्या हळदीचा आंबटगोड ठेचा, हिवाळ्यातल्या जेवणाची वाढते रंगत...

Awalycha Thecha : How To Make a Awalycha Thecha At Home : AAMLA AUR KACCHI HALDI KA THECHA : Gooseberry Recipe : यंदाच्या हिवाळ्यात आवळा आणि ओल्या हळदीचा ठेचा नक्की ट्राय करुन पाहाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2024 05:43 PM2024-11-14T17:43:46+5:302024-11-14T17:45:45+5:30

Awalycha Thecha : How To Make a Awalycha Thecha At Home : AAMLA AUR KACCHI HALDI KA THECHA : Gooseberry Recipe : यंदाच्या हिवाळ्यात आवळा आणि ओल्या हळदीचा ठेचा नक्की ट्राय करुन पाहाच...

Awalycha Thecha How To Make a Awalycha Thecha At Home AAMLA AUR KACCHI HALDI KA THECHA | खाऊन तर पाहा आवळा आणि ओल्या हळदीचा आंबटगोड ठेचा, हिवाळ्यातल्या जेवणाची वाढते रंगत...

खाऊन तर पाहा आवळा आणि ओल्या हळदीचा आंबटगोड ठेचा, हिवाळ्यातल्या जेवणाची वाढते रंगत...

'ठेचा' हा महाराष्ट्रातील बहुतेक सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. मस्त झणझणीत, डोळ्यांतून पाणी आणणारा ठेचा आणि भाकरी म्हणजे अगदी परफेक्ट जोडी. गरमागरम भाकरी आणि ठेचा खाण्यात जी मज्जा आहे ती बाकी कशात नाही. ठेचा म्हटलं की साधारणतः हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे वापरुन मस्त फक्कड झणझणीत ठेचा तयार केला जातो. पण कधी आंबटगोड आवळ्याचा ठेचा खाल्ला आहे का ?(Awalycha Thecha).

सध्या थंडीचे दिवस सुरु झालेत. बाजारांत सगळीकडे मस्त आंबटगोड चवीचे टपोरे आवळे विकायला ठेवलेले असतात. थंडीत आवळ्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरते. यासाठीच आपण आवळ्यापासून आवळा सुपारी, आवळा कँडी, आवळ्याचा मुरांबा असे अनेक पदार्थ करुन खातो. आवळ्याच्या या सगळ्या पदार्थांबरोबरच यंदाच्या हिवाळ्यात आवळा आणि ओल्या हळदीचा ठेचा नक्की ट्राय करुन पाहा. आवळ्याच्या ठेचा आपण ज्वारी, बाजरी किंवा नाचणीच्या भाकरी सोबत खाऊ शकता. जेवणात आवडती भाजी नसेल तर तोंडी लावायला म्हणून किंवा वरण भातासोबत देखील आपण हा ठेचा चवीने खाऊ शकता. आवळ्याचा ठेचा घरच्या घरी तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make a Awalycha Thecha At Home).

साहित्य :- 

१. आवळा - १५० ग्रॅम 
२. ओली हळद - ५० ग्रॅम 
३. जिरे - १ टेबलस्पून 
४. हिंग - १/२ टेबलस्पून 
५. लसूण - २ ते ३ लसूण पाकळ्या
६. मीठ - चवीनुसार
७. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ (मध्यम आकाराचे तुकडे)
८. शेंगदाणे - १/२ कप 
९. कोथिंबीर - मूठभर 
१०. लिंबाचा रस - १ टेबलस्पून 

ताज्या टपोऱ्या आवळ्यांची करा बाजारात मिळते तशी आवळा कॅंडी, पाहा रेसिपी; आवळा खा -राहा तरुण...


डाळीला कीड लागते? चमचाभर ‘हे’ तेल लावून ठेवा, किडे न होता डाळ टिकेल वर्षभर...

कृती :-

१. सर्वातआधी आवळे स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून लहान तुकडे करुन घ्यावेत. 
२. ओली हळद स्वच्छ धुवून त्यावरील सालं काढून त्याचे लहान तुकडे करुन घ्यावेत. 
३. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात फोडणीसाठी जिरे, चवीनुसार हिंग आणि लसूण पाकळ्या घालाव्यात. 
४. जिरे तडतडू लागल्यावर यात आवळा व हळदीचे कापून घेतलेले बारीक तुकडे घालावेत. यात चवीनुसार मीठ घालाव. 

तुपासाठी साय साठवताना लक्षात ठेवा ६ गोष्टी, साय खराब होणार नाही, तूपही निघेल भरपूर...

५. आता आवळा शिजून थोडा मऊ होईपर्यंत या पॅनवर झाकण ठेवावे. ४ ते ५ मिनिटे आवळा शिजवून घ्यावा. 
६. आता पॅनवरचे झाकण उघडून यात हिरव्या मिरचीचे तुकडे आणि शेंगदाणे घालावेत. ४ ते ५ मिनिटे हे सगळे जिन्नस हलकेच परतून घ्यावे. 
७. सगळ्यांत शेवटी गॅसची फ्लेम बंद करून यात कोथिंबीर देटासहित घालावी. सगळे जिन्नस चमच्याने हलवून एकजीव करुन घ्यावेत.
८. आता हे पॅनमधील सगळे मिश्रण एका डिशमध्ये काढून थोडे गार करुन घ्यावे. 
९. आवळ्याच्या ठेच्याचे हे मिश्रण गार झाल्यावर खलबत्यात हे सगळे जिन्नस ओतून थोडी जाडसर भरड होईल असे ठेचून घ्यावे. 

आवळ्याचा मस्त आंबटगोड चवीचा चमचमीत ठेचा आपण ज्वारी, बाजरीच्या भाकरी सोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

Web Title: Awalycha Thecha How To Make a Awalycha Thecha At Home AAMLA AUR KACCHI HALDI KA THECHA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.