Sesame Seeds : शरीराला वेगवेगळे पोषक तत्व, मिनरल्स आणि खनिजांची गरज असते. जी आपल्याला वेगवेगळ्या पदार्थांमधून मिळतात. दूध हे संपूर्ण आहार मानलं जातं. कारण यातून आयर्न, प्रोटीन, कॅल्शिअम आणि वेगवेगळे व्हिटॅमिन्स मिळतात. कॅल्शिअम आणि प्रोटीन मिळवण्यासाठी भरपूर लोक नियमितपणे दूध पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, काळ्या किंवा पांढऱ्या तिळामध्ये या गोष्टी दुधापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असतात. मात्र, अनेकांना तीळ खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते.
आयुर्वेद डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी तीळ खाण्याची योग्य पद्धत एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली. सोबतच त्यांनी तीळ खाण्याचे फायदेही सांगितले. जे वाचून तुम्ही तीळ कितीही महाग असले तरी नियमितपणे खाणं सुरू कराल.
तीळ भलेही आकारानं बारीक असतात. मात्र, त्यांमध्ये पोषक तत्व भरपूर असतात. यांचा वापर वेगवेगळे आयुर्वेद चिकित्सांमध्येही केला जातो. अशात तीळ जाणून घेऊ तीळ खाण्याची योग्य पद्धत आणि त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांबाबत.
गूळ आणि तीळ मासिक पाळीत फायदेशीर
दोन चमचे काळे किंवा पांढरे तीळ घ्या. थोडा गूळ घ्या आणि तीन ते चार काळी मिरीचे दाणे घ्या. या गोष्टी एक ग्लास पाण्यात टाकून चांगल्या उकडू द्या. पाणी एक कप शिल्लक राहील इतकं उकडा.
मासिक पाळीदरम्यान होणारी वेदना या पाण्यानं दूर होईल
खिचडीत टाकून खाण्याचे फायदे
मूगाच्या खिचडीमध्ये साधारण २ चमचे तीळ बारीक करून टाका. ही खिचडी खाल्ल्यानं तुम्हाला असलेली बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. नियमितपणे ही खिचडी खाल तर पोट चांगलं साफ होईल.
पांढरे केस पुन्हा काळे होतील
तिळाच्या तेलाचे दोन थेंब रोज नाकात टाकल्यानं आणि तिळाच्या तेलानं डोक्याची मालिश केल्यानं पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतील. तसेच केस आणखी मजबूत होतील.
हाडं होतील मजबूत
काळ्या किंवा पांढऱ्या तिळमध्ये कॅल्शिअम आणि झिंक भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे हाडं मजबूत होतात. ऑस्टियोपोरोसिस सारखी समस्या कमी करण्यास यानी मदत मिळते. त्याशिवाय तिळात फायबरही भरपूर असतं, जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतं आणि पचन तंत्र मजबूत करतं.
हृदयसाठी फायदेशीर
तिळामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. जे कोलेस्टेरॉल कंट्रोल करतात. नियमितपणे तीळ खाल्ल्यास हृदयरोगांचा धोका कमी केला जाऊ शकतो. तिळाच्या बियांमध्ये प्रोटीन, आयर्न आणि व्हिटॅमिन बी असतं. ज्यामुळे थकवा कमी होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते.
डायबिटीसमध्ये फायदेशीर
तिळाच्या बियांमध्ये असलेल्या मॅग्नेशिअमनं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. यानं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासही मदत मिळते. तसेच या बियांमध्ये झिंक, सेलेनियम आणि कॉपरही असतं, ज्यामुळे इम्यूनिटी मजबूत होते.