मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. अनेक तज्ज्ञ आयुर्वेदात हे अमृतासमान असल्याचं वर्णन करतात. मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स, पॉलीफेनॉल, अँटीबैक्टीरियल आणि अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म देखील आहेत. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हजारो वर्षांपासून याचा वापर केला जात आहे.
मधाचं चुकीच्या पद्धतीने केलेलं सेवन आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. धक्कादायक बाब म्हणजे ९० टक्के लोक चुकीच्या पद्धतीने मधाचं सेवन करत आहेत. शहरांमध्ये हे प्रमाण आणखी जास्त आहे. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. रेखा राधामोनी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
कसं खाऊ नये मध?
डॉ. रेखा राधामोनी म्हणतात की, आयुर्वेदात कोणत्याही स्वरूपात मध करून गरम खाण्यास मनाई आहे. म्हणून मध थेट गरम करून किंवा गरम दूध, गरम पाणी, चहा किंवा लिंबू पाण्यात मिसळून सेवन करत असाल तर आताच थांबा. हे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.
शरीरात होईल विष
आयुर्वेदात गरम मध हे एका विषाप्रमाणे मानलं जातं, ज्यामुळे शरीरात विषारीपणा निर्माण करते. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरातील म्यूकस आणि टॉक्सिसिटी इतकी वाढते की विविध आजार होऊ शकतात.
शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही पॅकबंद मध खरेदी केला जात आहे. रेखा यांच्या मते, हे खूप उच्च तापमानात गरम केलं जातं. दुकानातून मध विकत घेण्याऐवजी नैसर्गिक मध विकणाऱ्यांकडूनच मध खरेदी करा. अजिबात गरम करून त्याचा वापर करू नका.
मध खाण्याचे फायदे
इम्यूनिटी वाढेल
रोज मध खाल्ल्यानं इम्यूनिटी मजबूत होते. सोबतच सर्दी-खोकल्यासारख्या समस्या दूर होतात.
चांगली झोप
रात्री जर तुम्हाला झोप येत नसेल तर १ चमचा मध खा. तुम्हाला चांगली झोप येईल.
पचन नीट होईल
जर तुमची पचनक्रिया बिघडली असेल तर रोज थोडं मध चाखा. यामुळे पचन नीट होईल. पोटासंबंधी अनेक समस्याही दूर होतील.
वजन कमी होईल
जर तुम्हाला तुमचा लठ्ठपणा कमी करून वजन कमी करायचं असेल तर रोज सकाळी पाण्यात एक चमका मध टाकून प्या. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.