Join us  

उपाशी राहून वजन भराभर कमी होतं? कायम सुडौल, मेंटेन राहण्यासाठी आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:01 PM

Ayurvedic tips for weight loss : वजन कमी करण्यासाठी योग्यवेळी योग्य प्रमाणात घेतलेला समतोल आहार फायदेशीर ठरतो

वजन वाढण्याची समस्या आजकाल खूपच कॉमन झाली आहे.  खाण्यातले बदल, फास्ट फूडचं अतिसेवन, हालचालींचा अभाव यामुळे वजन जास्तच वाढत जातं. वजन कमी करण्यासाठी लोक खाणं कमी करतात तर काहीजण एक वेळ पूर्ण उपाशी राहतात. (Tips for Weight Loss That Actually Work)

वजन घटवण्यासाठी काही सोपे उपाय तुमच्यासाठी परिणामकारक ठरू शकतात. आयुर्वेदात वजन  कमी करण्याासाठी जेवणाचे काही नियम आहेत. ते लक्षात घेतल्यास जास्त न घेता तब्येत चांगली राहू शकते. (How to lose Weight)

आयुर्वेदीक तज्ज्ञांच्यामते वजन कमी करण्याासाठी उपाशी राहण्याची काही गरज नाही.  भूक लागली असतानाही कमी खाणं टाळा. जर तुम्ही भरपूर भूक असतानाही  कमी जेवलात तर याचे काही  साईड इफेक्ट्स  जाणवू  शकतात.  तुमचा चेहरा उतरतो,  ताकद कमी होऊ शकते, वाताचे आजार होऊ शकतात किंवा पचनाशी संबंधित आजारही होऊ शकतात. पोट साफ न होणं, बद्धकोष्टता, इ....

बीपी अचानक वाढते? हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे? -१ आयुर्वेदिक उपाय- जीवनशैलीतला बदलही आवश्यक

वजन कमी करण्यासाठी योग्यवेळी योग्य प्रमाणात घेतलेला समतोल आहार फायदेशीर ठरतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या क्षमतेनुसार संतुलित आहार घ्यायला हवा. यासाठी जवळच्या आयुर्वेदीक तज्ज्ञांशी संपर्क साधा.

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स