Lokmat Sakhi >Food > रामदेव बाबांनी दाखवली डिंकाच्या लाडूची रेसिपी; रोज १ लाडू खा, हाडांना बळकटी येईल, अशक्तपणा दूर

रामदेव बाबांनी दाखवली डिंकाच्या लाडूची रेसिपी; रोज १ लाडू खा, हाडांना बळकटी येईल, अशक्तपणा दूर

Baba Ramdev Shares Recipe Of Dink Laddu : रामदेव बाबांनी एका व्हिडिओत पौष्टीक डिंकाचे लाडू बनवण्याची रेसिपी  शेअर केली आहे. त्यांनी ही रेसिपी त्याच्या आईकडून शिकून घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 02:20 PM2024-11-24T14:20:57+5:302024-11-24T14:26:16+5:30

Baba Ramdev Shares Recipe Of Dink Laddu : रामदेव बाबांनी एका व्हिडिओत पौष्टीक डिंकाचे लाडू बनवण्याची रेसिपी  शेअर केली आहे. त्यांनी ही रेसिपी त्याच्या आईकडून शिकून घेतली आहे.

Baba Ramdev Shares Recipe Of Energy Boosting Dink Laddu Baba Ramdev Dink Laddu Recipe   | रामदेव बाबांनी दाखवली डिंकाच्या लाडूची रेसिपी; रोज १ लाडू खा, हाडांना बळकटी येईल, अशक्तपणा दूर

रामदेव बाबांनी दाखवली डिंकाच्या लाडूची रेसिपी; रोज १ लाडू खा, हाडांना बळकटी येईल, अशक्तपणा दूर

योगगुरू बाबा रामदेव (Yog Guru Baba Ramdev) वेगवेगळ्या प्रकारच्या योगासनांतून  शरीराच्या त्रासापासून सुटका कशी मिळवायची ते शिकवतात. तसंच आयुर्वेदीक उपायांचे सल्लेही देतात. बाबा रामदेव यांनी सांगितलेले काही उपाय फॉलो करून तुम्ही  शरीराच्या  बऱ्याच विकारांपासून सुटका मिळवू शकता. रामदेव बाबांनी एका व्हिडिओत पौष्टीक डिंकाचे लाडू बनवण्याची रेसिपी  शेअर केली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ही रेसिपी त्याच्या आईकडून शिकून घेतली आहे. बाबा रामदेव  यांच्यामते हे लाडू सगळ्यात स्वस्त सुपर टॉनिक बलवर्धक डिंकाचे लाडू आहेत आहेत.  डिंकाचे लाडू करण्याची सोपी रेसिपी समजून घेऊ. (Baba Ramdev Shares Recipe Of Energy Boosting Dink Laddu Recipe)

डिंकाचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी कढईत गाईचं तूप गरम करायला ठेवा. त्यात ३ मूठ भरून डिंक घाला.  नंतर डिंक तुपात व्यवस्थित तळून घ्या. डिंक जास्त काळे होऊ देऊ नका अन्यथा त्याची कडवट चव लागेल.  जेव्हाही तुम्ही डिंक तुपात घालाल तेव्हा तुप व्यवस्थित गरम असावं. थंड तुपात कधीच डिंक घालू नका.  

दुसऱ्या कढईमध्ये बेसन भाजून घ्या. रामदेव बाबा सांगतात की डिंकाचे लाडू बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, नाचणी किंवा चवळीच्या पिठाचा वापर करायला हवा. यामुळे लाडू अधिक  हेल्दी बनतात. बेसन आणि तूप भाजल्यानंतर दोन्ही पदार्थ एका कढईत काढून व्यवस्थित शिजवा. दोन्ही पदार्थ व्यवस्थित शिजल्यानंतर  त्यात गरजेनुसार डिंक मिसळा आणि मिश्रण  थंड झाल्यानंतर थंड करा त्यानंतर लाडू बनवून घ्या. 

दुसरी पद्धत

माव्यात डिंक मिसळून डिंकाचे लाडू तुम्ही बनवू शकता.  त्यासाठी कढईत शिजलेला मावा घेऊन त्यात डिंक मिसळून  शिजवून घ्या. त्यात थोडे ड्राय फ्रुट्स आणि फळाच्या कोरड्या बिया मिसळू शखता. या मिश्रणानं  लाडू किंवा डिंकाची बर्फी बनवणं खूपच सोपं आहे.

तिसरी पद्धत

कढईत हळद आणि शिलाजीत मिसळून त्यात थोडं केसर घाला. त्यात थोड्या फळांच्या बिया कुटून घाला. त्यात तुम्ही डिंक आणि ड्राय फ्रुट्स घालू शकता.  या मिश्रणाचे सेवन हळदीच्या दुधासोबत करा.  बाबा रामदेव यांच्या मते एक वाटी दुधात २ चमचे हे मिश्रण मिसळून तुम्ही लहान मुलांना पाजू शकता, यात ओवा भाजून घाला याशिवाय अश्वगंधा, शतावरी, पांढरी मुसळी सुद्धा मिसळू शकता. 

Web Title: Baba Ramdev Shares Recipe Of Energy Boosting Dink Laddu Baba Ramdev Dink Laddu Recipe  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.