Lokmat Sakhi >Food > कपभर बदामाची करा पौष्टीक वडी; बुद्धी होईल तीक्ष्ण-आरोग्य राहील सुदृढ; मिळतील फायदेच-फायदे..

कपभर बदामाची करा पौष्टीक वडी; बुद्धी होईल तीक्ष्ण-आरोग्य राहील सुदृढ; मिळतील फायदेच-फायदे..

Badam Pak Recipe - Boost Memory & Energy | Almond Pak - 100 Plus Health Benefits : एक्जामच्या तयारीसाठी मुलांना रोज खायला द्या एक बदामाची वडी; वाचलेलं सगळं राहील लक्षात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2024 05:25 PM2024-03-03T17:25:01+5:302024-03-03T17:26:01+5:30

Badam Pak Recipe - Boost Memory & Energy | Almond Pak - 100 Plus Health Benefits : एक्जामच्या तयारीसाठी मुलांना रोज खायला द्या एक बदामाची वडी; वाचलेलं सगळं राहील लक्षात..

Badam Pak Recipe - Boost Memory & Energy | Almond Pak - 100 Plus Health Benefits | कपभर बदामाची करा पौष्टीक वडी; बुद्धी होईल तीक्ष्ण-आरोग्य राहील सुदृढ; मिळतील फायदेच-फायदे..

कपभर बदामाची करा पौष्टीक वडी; बुद्धी होईल तीक्ष्ण-आरोग्य राहील सुदृढ; मिळतील फायदेच-फायदे..

बदाम. बुद्धी तीक्ष्ण आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारं ड्रायफ्रुट. बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियमसह अनेक पोषक घटक आढळतात. नियमित बदाम खाल्ल्याने बॅड कोलेस्टेरॉल, रक्तदाब, लठ्ठपणा यासह इतर गंभीर आजारांचा धोका कमी होतो. बदाम खाण्याच्या अनेक पद्धती आहेत. काही भिजलेले तर काही न भिजवता बदाम खातात (Memory Sharp). काही लोकं बदाम खाण्यास कंटाळा किंवा टाळाटाळ करतात. त्यांच्यासाठी आपण खास बदाम पाक किंवा बदामाच्या वड्या तयार करू शकता (Almond).

काही लहान मुलं  बदाम खाताना नाकं मुरडतात. आपण त्यांच्यासाठी खास बदाम पाक ही रेसिपी तयार करू शकता (Health Benefits). दिवसभरात बदामाची एक वडी खाल्ल्याने मेमरी बुस्ट होते, शिवाय दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते(Badam Pak Recipe - Boost Memory & Energy | Almond Pak - 100 Plus Health Benefits).

बदामाच्या वड्या तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

तूप

बदाम

डिंक

सूर्यफुलाच्या बिया

ओल्या नारळाचे किस

गुळ

पाणी

केशरी रंग

पाणी आणि ५ गुलाबच्या पाकळ्या; १०० % शुद्ध गुलाब जल करण्याची सोपी कृती-चेहऱ्यासाठी वरदान

केसर

खसखस

वेलची पूड

कृती

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात एक कप बदाम घालून त्याची पावडर तयार करा. पॅनमध्ये ३ चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात २ टेबलस्पून डिंक घालून मध्यम आचेवर भाजून घ्या. डिंक भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या, व एका वाटीने डिंकाला फोडून त्याची जाडसर पावडर तयार करा.

नंतर पॅनमध्ये २ टेबलस्पून सूर्यफुलाच्या बिया, ओल्या नारळाचे किस भाजून घ्या. भाजलेलं साहित्य डिंकामध्ये घालून मिक्स करा. नंतर पॅनमध्ये २ चमचे तूप घाला, व त्यात बदाम पावडर घालून भाजून घ्या. बदामाच्या पावडरला सोनेरी रंग आल्यानंतर त्यात एक कप मिल्क पावडर घालून मिक्स करा, व भाजलेल्या साहित्यामध्ये घालून मिक्स करा.

ना पेस्ट-ना खर्च, फक्त अर्धा टोमॅटो घ्या आणि मानेवर रगडा; मानेच्या काळेपणावर घरगुती उपाय

एका कढईत एक कप किसलेला गुळ घाला. त्यात अर्धा कप पाणी घालून मिक्स करा. गुळ पाण्यात विरघळल्यानंतर आणि त्याला उकळी आल्यानंतर त्यात अर्धा चमचा केशरी रंग, एक चमचा खसखस घालून मिक्स करा. नंतर त्यात भाजलेलं सर्व साहित्य, एक चमचा वेलची पूड, एक चमचा केसर घालून साहित्य मिक्स करा.

एका डब्यात बटर पेपर ठेवा, व त्यात तयार मिश्रण ओतून पसरवा. मिश्रणावर सजावटीसाठी आपण त्यावर चिरलेले बदाम घालू शकता. काही वेळानंतर सुरीने एक आकार देऊन वड्या कट करून घ्या. अशा प्रकारे बदामाचे पोष्टिक वडी खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Badam Pak Recipe - Boost Memory & Energy | Almond Pak - 100 Plus Health Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.