Join us  

होळी स्पेशल : रंग खेळून झाले की प्या गारेगार ‘बदाम थंडाई’, साजरी करा यादगार होळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2023 3:39 PM

Badam Thandai: the summer drink that celebrates the spirit of Holi बदाम थंडाई हा मस्त गारेगार पदार्थ पिऊन रंग खेळण्याचा आनंदही वाढेल आणि तब्येतीलाही चांगले

होळी म्हटलं की उत्साहाचं वातावरण आलंच. अनेक ठिकाणी धुलिवंदनानिमित्त थंडाई आवर्जून पिण्यात येते. बाजारात विविध फ्लेवरची थंडाई मिळते. पण यामध्ये वापरली जाणारी सामग्री आरोग्यासाठी पोषकच असेल असे नाही. होळी सणानिमित्त थंडाई तयार करण्याची परंपरा आहे. उत्तर भारतात थंडाई प्रचंड फेमस आहे. या पेयामुळे शरीराला थंडावा आणि ऊर्जा मिळते. सुकामेव्याचा समावेश करून हा पेय तयार करण्यात येतो.

आपण घरी देखील थंडाई बनवू शकता. बदाम थंडाई ही रेसिपी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे. या पेयामुळे शरीराला नक्कीच अनेक पौष्टीक घटक मिळतात. बदममध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन-ई, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या घटकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे पेय आपल्या शरीरासाठी नक्कीच फायदेचं ठरेल(Badam Thandai: the summer drink that celebrates the spirit of Holi).

बदाम थंडाई बनवण्यासाठी लागणारं साहित्य

दूध १ लिटर

बडीशेप १ टीस्पून

खसखस १ टीस्पून

बदाम १२

वेलची ३

साखर 2 चमचे

हॉटेलस्टाइल कुरकुरीत कांदा भजी करण्याची १ झटपट ट्रिक, भजी होतील खमंग

बदाम थंडाई बनवण्याची पद्धत

बदाम थंडाई बनवण्यासाठी सर्वप्रथम, एका कढईत दुध उकळवत ठेवा. दुध गरम झाल्यानंतर त्यात साखर घालून साधारण ५ मिनिटे उकळवा. यानंतर २-३ तास ​​भिजवलेले बदाम सोलून, मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. नंतर दुधात बदामाची पेस्ट घालून चांगले मिसळा.

उत्तरप्रदेशातल्या पारंपरिक गुजिया यंदा होळीला खाऊन तर पाहा! अस्सल देसी गोड पदार्थ- रेसिपीही सोपी

मिश्रण मिक्स झाल्यानंतर मिश्रणाला एक उकळी द्या, यानंतर, दुध थंड होण्यासाठी थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. अशा प्रकारे स्वादिष्ट आणि आरोग्यदायी बदामाची थंडाई तयार आहे. यावरून आपण चिरलेले बदाम, काजू, पिस्ते व इतर ड्रायफ्रुट्स बारीक करून सजवू शकता. होळीच्या रंगी बेरंगी खेळानंतर आपण या थंडाईचा आनंद लुटू शकता.

टॅग्स :अन्नहोळी 2023कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स