पावसाळा आला की बहुतांश घरात नेहमीच तळण होते. कारण या दिवसांत पाऊस पडू लागला की खमंग- कुरकुरीत खाण्याची इच्छा होते. मग कांद्याची भजी, कांदा पकोडे, बटाट्याची भजी, आलू वडे असं काही ना काही नेहमीच तळलं जातं. आता त्याच जोडीला वांग्याचे पकोडेही करून बघा. वांगी आवडत नाहीत, असं म्हणणारेही मोठ्या आवडीने वांगे पकोडे खातील. त्यामुळे या पावसाळ्यात एकदा होऊनच जाऊ द्या वांग्याचे खमंग- कुरकुरीत असे वांगे पकोडे (How to make baingan pakoda).. त्यासाठीच पाहा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapur) यांनी शेअर केलेली ही खास रेसिपी (Baigan pakoda recipe). रेसिपी अगदी सोपी आहे.
कसे करायचे वांग्याचे पकोडे?
साहित्य
१ मध्यम आकाराचं वांगे
अर्धा कप हरबरा डाळीचं पीठ
१ टीस्पून कसूरी मेथी
१ टीस्पून ओवा
१ टीस्पून धने- जीरे पूड
चाट मसाला
चवीनुसार तिखट आणि मीठ
तळण्यासाठी तेल
रेसिपी
१. सगळ्यात आधी एका भांड्यात हरबरा डाळीचं पीठ घ्या.
२. त्या पीठात मीठ, तिखट, धने, जीरे पूड, कसूरी मेथी, ओवा टाका.
३. आता नेहमी भजी करण्यासाठी जसं पीठ भिजवता तसं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्या.
४. वांग्याच्या गोलाकार फाेडी करा.
सैफ उत्तम स्वयंपाक आनंदानं करतो, मी तिकडे फिरकत नाही! करिना कपूर सांगतेय, स्वयंपाकाची बदलती गोष्ट
५. त्या सगळ्या फोडी एका ताटात पसरवून घ्या आणि फोडींवर दोन्ही बाजूने तिखट, मीठ, चाटमसाला लावून घ्या.
६. आता एकेक करून फोडी घ्या, भिजवलेल्या डाळीच्या पीठात छानपैकी घोळा आणि तापत्या तेलात तळायला सोडून द्या.
७. वांग्याचे खमंग, कुरकुरीत पकोडे खाण्यासाठी झाले तयार...