नाश्त्यासाठी काय करावं किंवा मुलांना डब्यात काय द्यावं, हा प्रश्न रोजच्या रोज घरातल्या महिलांना पडतोच. कारण नेहमी तेच ते पदार्थ करणं घरातल्यांना आणि आपल्याला स्वत:लाही मुळीच आवडत नाही. चवीमध्ये बदल झाला तर घरातले सगळेच जण खुश होतात आणि पोटभर खातात (perfect menu for breakfast and kids tiffin). म्हणूनच वेगवेगळ्या रेसिपींच्या शोधात तुम्ही असाल तर ही एक रेसिपी लगेच बघून घ्या. बाजरीची भाकरी अनेकांना आवडत नाही. पण थंडीच्या दिवसांत बाजरी अतिशय पौष्टिक आणि अंगात उष्णता निर्माण करणारी ठरते. त्यामुळे एरवी नाही खाल्ली तरी हिवाळ्यात बाजरी आवर्जून खायलाच हवी, असं तज्ज्ञ सांगतात (bajra aata appe recipe). म्हणूनच आता पौष्टिक बाजरी घरातल्या सगळ्यांच्याच पोटात जावी म्हणून बाजरीच्या पिठाचे आप्पे कसे करायचे ते पाहा..(bajarichya pithache appe recipe in Marathi)
बाजरीच्या पिठाचे आप्पे करण्याची रेसिपी
साहित्य
१ कप बाजरीचे पीठ
अर्धा कप रवा
अर्धी वाटी ताक
दिवाळीत गोडगोड खाऊन कंटाळलात? पुदिन्याची चटणी ‘अशी’ चटकदार करा, तोंडाला येईल चव, पचनही सुधारेल
२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१ टीस्पून आलं- लसूण पेस्ट
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा
अर्धा टीस्पून बेकिंग सोडा
१ टीस्पून जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी एका भांड्यात बाजरीचे पीठ, रवा, ताक एकत्र करा आणि थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजवून घ्या. एरवी डाळ- तांदूळाचे आप्पे करताना पीठ जेवढं घट्ट असतं, तसंच हे देखील पीठ भिजवावं.
आता भिजवलेल्या पिठामध्ये चवीनुसार मीठ, जिरे पूड घालून बारीक चिरलेला कांदा, आलं- लसूण पेस्ट, मिरच्या, कोथिंबीर घालावं.
हवा शुद्ध करणारी 'ही' रोपं तुमच्याकडे आहेत का? घरातला कुबट वास घालवून घर ठेवतात फ्रेश
आता हे पीठ फक्त ५ ते ७ मिनिटांसाठी झाकून ठेवा.
त्यानंतर या पिठामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग सोडा थोड्याशा पाण्यात कालवून घाला. पीठ एकदा हलवून घ्या आणि लगेचच आप्पे पात्राला तेल लावून गरमागरम आप्पे करा.
बाजरीचे आप्पे नेहमी मध्यम आचेवर करावे. जास्त खमंग आणि खुसखुशीत होतात.