Join us  

इडली-भजी फुगण्यासाठी सोडा घालता? जेवणात सोडा वापरल्याने शरीरावर काय इफेक्ट होतो-पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 11:21 AM

Baking Soda Uses and Side Effects : जेवणात सोडा वापरल्याशिवाय अनेकांचे जेवण पूर्णच होत नाही. शेफ आणि फूड ब्लॉगर्स अनेकदा जेवणात सोडा वापरताना दिसतात.

सकाळच्या नाश्त्याला बरेचजण इडली, डोसा खातात. हे पदार्थ नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत. शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व यातून मिळतात. वडा, भजी, इडली फुलण्यासाठी त्यात सोडा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. जेवणात सोडा वापरल्याशिवाय अनेकांचे जेवण पूर्णच होत नाही. शेफ आणि फूड ब्लॉगर्स अनेकदा जेवणात सोडा वापरताना दिसतात. (Baking Soda Uses and Side Effects)

रोजच्या जेवणात बेकींग सोडा किंवा इनो वापरल्यामुळे तब्येतीचं नुकसान होऊ शकतं. इडली, डोसा किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी बेकींग सोड्याचा वापर का करू नये याबाबत जुही कपूर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बेकींग सोडा वापरल्याने काय परिणाम होतो. याबाबत अधिक माहिती दिली आहे. (What Happen When You Use Too Much Baking Soda in Food)

न्युट्रिशनिस्ट जुही कपूर यांच्यामते कधीतरी जर तुम्ही स्वयंपाक करताना बेकींग सोडा वापरत असाल तर यात काही चुकीचं नाही. पण  केक ब्रेड, डोसा, इडली किंवा ढोकळा बनवताना तुम्ही पीठात तुम्ही रोज बेकींग सोडा मिसळत असाल तर ही सवय तुमच्यासाठी हानीकारक ठरू शकते.

दुधापेक्षा दुप्पट कॅल्शियम देतील ८ पदार्थ; प्रोटीन-कॅल्शियम भरभरून मिळेल, हाडं होतील बळकट

बेकींग सोड्यात प्रकृतिक एसिड असते. ज्यामुळे रक्त एसिडिक बनते आणि पीएच संतुलनावर परिणाम होतो.  शारीरिक प्रक्रिया रक्त पीएच एका मर्यादेतच नियंत्रणात ठेवू शकतात. पीएच संतुलन बिघडल्यामुळे तब्येतीचं नुकसानही होऊ शकतं.

दंड, पोटावर फॅट्स- शरीर जाड दिसतं? नियमित ३ गोष्टी करा, १५ दिवसांत वजन होईल

याशिवाय मेटाबॉलिझ्मवर परिणाम होतो. किडनीची कार्यपद्धती बिघडते.  शरीरात वॉटर रिटेंशनची समस्या वाढते. किडनी फेलिअर किंवा इतर समस्याही वाढू शकतात. याव्यतिरिक्त सोडियन बायकायर्बोनेट शरीरातील मेटाबॉलिझ्म आणि मांसपेशीच्या कार्यावर परिणाम करते.

स्वंयपाकात बेकींग सोड्याऐवजी काय वापरावे?

१) स्वयंपाकात बेकींग सोडा घालण्याऐवजी तुम्ही मीठ घालून काहीवेळ पीठ तसंच ठेवा. जेणेकरून पीठ फुलण्यास मदत होईल.

२) डोसा,  इडली, ढोकळ्याचे बॅटर नैसर्गिकरित्या आंबवण्यासाठी ठेवा. 

३) केक बनवण्यासाठी तुम्ही अंडी किंवा फ्लेक्स जेलचा वापर करू शकता.

४) बेकरी प्रोड्क्टस बनवण्यासाठी यीस्टचा वापर करा. 

५) ब्रेड, बिस्कीट्स असे पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही थोडं आंबट पीठ तयार करू शकता.  

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न