Lokmat Sakhi >Food > Banana buying guide tips : केळी विकत घेताना फक्त ४ गोष्टी लक्षात ठेवा; तब्येतीला पुरेपूर मिळेल फायदा

Banana buying guide tips : केळी विकत घेताना फक्त ४ गोष्टी लक्षात ठेवा; तब्येतीला पुरेपूर मिळेल फायदा

Banana buying guide tips : केळी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून (Easy hacks tricks to pick the best  bunch of bananas) केळी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही बाजारातून चांगली केळी घरी आणू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 02:18 PM2022-02-17T14:18:49+5:302022-02-17T15:14:44+5:30

Banana buying guide tips : केळी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून (Easy hacks tricks to pick the best  bunch of bananas) केळी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही बाजारातून चांगली केळी घरी आणू शकता.

Banana buying guide tips : Banana buying guide tips how to pick the best bunch of bananas | Banana buying guide tips : केळी विकत घेताना फक्त ४ गोष्टी लक्षात ठेवा; तब्येतीला पुरेपूर मिळेल फायदा

Banana buying guide tips : केळी विकत घेताना फक्त ४ गोष्टी लक्षात ठेवा; तब्येतीला पुरेपूर मिळेल फायदा

केळी हे फळ जवळपास सगळ्यांनाच आवडते. या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे प्रत्येक हंगामात बाजारात उपलब्ध असते. केळी हेल्दी असण्यासोबतच खायलाही खूप चविष्ट असतात. (Banana buying guide tips)  सर्वात चांगली गोष्ट म्हणजे केळीचे सेवन अनेक प्रकारे करता येते. हे फळ सॅलेडपासून भाज्यांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. (How to Select and Store Banana)

केळी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून (Easy hacks tricks to pick the best  bunch of bananas) अशा वेळी केळी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही बाजारातून चांगली केळी घरी आणू शकता. जर तुम्ही चांगली केळी निवडली तर ते लवकर खराब होणार नाही आणि त्याची चवही चांगली राहील. तुम्ही बाजारात केळी खरेदी करायला जाता तेव्हा केळी निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

केळ्याचा रंग

केळ्याचा रंग जितका स्पष्ट असेल तितकी केळी चांगली आणि चवदार लागतात. बाजारातून केळी विकत घ्यायला गेल्यावर जी केळी दिसायला पिवळी असतात तीच खरेदी करा. हे देखील लक्षात ठेवा की पिवळे आणि हिरवे दोन्ही रंगाचे असलेले केळी खरेदी करू नका कारण ते आतून कमी पिकलेले  असतात आणि त्याची चव देखील चांगली नसते. पूर्ण हिरवी असलेली केळी कच्ची असून भाजी म्हणून वापरली जाते. केळीवर कमीत कमी काळे डाग असावेत हेही लक्षात ठेवा. वास्तविक, ज्या केळीवर जास्त काळे डाग असतात, ते लवकर कुजतात किंवा खराब होतात.

 अचानक वाढणारी ब्लड शुगर नेहमी कंट्रोलमध्ये राहील; डायबिटीसला लांब ठेवण्यासाठी या घ्या टिप्स

गरजेनुसार केळी घ्या

केळी हे सर्वात स्वस्त फळ आहे. हे पौष्टिक देखील आहे, म्हणून लोक सहसा डझनभर केळी खरेदी करतात. पण 2 ते 3 दिवसात संपतील  तेवढीच केळी खरेदी करा. वास्तविक, केळी जास्त वेळ ठेवली तरी ती लवकर कुजतात. त्यामुळे गरजेनुसार केळी खरेदी करा आणि संपली की पुन्हा खरेदी करा.

आकारावर लक्ष द्या

तुम्हाला बाजारात अनेक प्रकारची केळी मिळतील. त्यात चव आणि आकारात भिन्नता आढळेल. मोठ्या आकाराची केळी खरेदी करण्याचा प्रयत्न करा. कारण लहान आकाराच्या केळीमध्ये काळे ठिपके जास्त असतात आणि त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता देखील वाढते.

साल अर्धवट निघालेलं केळी घेऊ नका

जर केळी कुठून तरी कापली गेली असेल किंवा त्याची साल निघाली असेल तर ती घेऊ नये. अशी केळी फार लवकर खराब होतेच, शिवाय बुरशीही त्यात लवकर अडकते, त्यामुळे वास येऊ लागतो.
 

Web Title: Banana buying guide tips : Banana buying guide tips how to pick the best bunch of bananas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.