Lokmat Sakhi >Food > बँगलोर स्टाईल खोबऱ्याच्या चटणीची परफेक्ट रेसिपी; इडली-डोशासोबत एकदा खाल तर...

बँगलोर स्टाईल खोबऱ्याच्या चटणीची परफेक्ट रेसिपी; इडली-डोशासोबत एकदा खाल तर...

Bangalore Style Coconut Chutney Recipe : ही चटणी इतकी चविष्ट असते की आपल्याही नकळत आपण प्रमाणापेक्षा जास्त नाश्ता करतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2023 11:15 AM2023-07-20T11:15:12+5:302023-07-20T11:18:46+5:30

Bangalore Style Coconut Chutney Recipe : ही चटणी इतकी चविष्ट असते की आपल्याही नकळत आपण प्रमाणापेक्षा जास्त नाश्ता करतो.

Bangalore Style Coconut Chutney Perfect Recipe; If you eat it once with idli-dosa... | बँगलोर स्टाईल खोबऱ्याच्या चटणीची परफेक्ट रेसिपी; इडली-डोशासोबत एकदा खाल तर...

बँगलोर स्टाईल खोबऱ्याच्या चटणीची परफेक्ट रेसिपी; इडली-डोशासोबत एकदा खाल तर...

इडली, डोसा, उतप्पा किंवा अगदी आप्पे हे साऊथ इंडीयन पदार्थ आपल्या आवडीचे असतात. सकाळच्या नाश्त्याला हेल्दी आणि पोटभरीचे काही हवे असल्याने आपण आवर्जून हे पदार्थ खातो. करायला सोपे, पचायला हलके आणि तरीही चविष्ट असे हे पदार्थ अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ले जातात. इडली किंवा डोसा असे काहीही असेल तरी आपल्याला त्याच्यासोबत सांबार, चटणी असे काही ना काही लागतेच. ही चटणी छान चविष्ट असावी अशी आपली इच्छा असते. कधी खोबऱ्याची तर कधी दाण्याची कधी लाल मिरच्या वापरुन लाल रंगाची अशी वेगवेगळ्या प्रकारे आपण ही चटणी करतो (Bangalore Style Coconut Chutney Recipe). 

पण आपली चटणी उडपी लोकांकडे मिळणाऱ्या चटणीसारखी कधीच होत नाही. यामागे खूप मोठे कारण नसून अतिशय सोप्या पद्धतीने आपण करतो तशीच चटणी ते करतात. पण ते वापरत असलेले प्रमाण नक्कीच काहीतरी वेगळे असणार. पाहूयात पण कर्नाटकची राजधानी असलेल्या बँगलोर स्टाइलची खास चटणी. ही चटणी इतकी चविष्ट असते की आपल्याही नकळत आपण प्रमाणापेक्षा जास्त नाश्ता करतो. नेहमीच्याच खोबऱ्याच्या चटणीसारखी तरीही वेगळी अशी खास चव असलेली ही चटणी कशी करायची पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)


१. १ वाटी ओल्या खोबऱ्याचे काप आणि त्यात भाजलेली चणी डाळ किंवा चटणीसाठी मिळणारी डाळ १ चमचा घालायची. 

२. यामध्ये धुतलेली कोथिंबीर, ८ ते १० कडीपत्त्याची पाने, साधारण १.५ ते २ मिरच्या आणि अंदाजे थोडंसं पाणी घालून हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. 

३. घट्टसर वाटणासारखे तयार झाले की त्यात चवीनुसार मीठ घालून पुन्हा थोडे पाणी घालून मिक्सरवर फिरवून घ्यायचे. 

४. ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आणि त्यावर गरम तडतडती फोडणी घालायची. 


५. फोडणीसाठी कढल्यात १ चमचा तेल घेऊन त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा उडदाची डाळ आणि अर्धा चमचा हरभरा डाळ घालू चांगली फोडणी करायची आणि ती या चटणीवर घालायची. 

६. ही चविष्ट चटणी डोसा, लोणी डोसा, स्पंज डोसा, इडली, उतप्पा अशा कशासोबतही अतिशय छान लागते. 

Web Title: Bangalore Style Coconut Chutney Perfect Recipe; If you eat it once with idli-dosa...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.