Join us  

Barfi with desi ghee and parle g : कमाल! १० रूपयांचे पारले-जी अन् साजूक तूप वापरून केली स्वादिष्ट, चवदार बर्फी, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 4:25 PM

Barfi with desi ghee and parle g : साजूक तुपात तळलेली बिस्कीटं दळून घेतल्यानंतर करण पार्ले-जी बिस्किटात दूध आणि भरपूर साखर घालून हलव्यासारखे मिश्रण बनवतो. 

वर्ष संपत आलं पण वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा आणि विचित्र फूड कॉम्बिनेशन्स ट्राय करण्याची लोकांची उत्सुकता काही संपली नाही. या वर्षात मिरिंडा पाणीपूरी, आईस्क्रिम मॅगी, ओरिओ पकोडे, पिझ्झा पुरणापोळी यांसारख्या अनेक विचित्र फूड कॉम्बिनेशन्सनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला. (Viral Food Combinations)

आता दिल्लीतील फूड ब्लॉगर करण सिंघल यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या रेसिपीने नेटिझन्सना वेड लावलं आहे. व्हिडिओची सुरुवात करताना करणनं काही बिस्किटे, देशी तूप, साखर, दूध आणि ड्रायफ्रूट्ससह पार्ले-जी बर्फी बनवण्याची रेसिपी दाखवली. साजूक तुपात तळलेली बिस्कीटं दळून घेतल्यानंतर करण पार्ले-जी बिस्किटात दूध आणि भरपूर साखर घालून हलव्यासारखे मिश्रण बनवतो.  (Barfi with desi ghee and parle g )

आत्तापर्यंत या क्लिपला 71 हजार पेक्षा जास्त लाईक्स आणि तुफान प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. इंटरनेटचा एक मोठा वर्ग या डिशबद्दल पूर्णपणे नाराज झाला आणि पार्ले-जी बिस्किटची चव बिघडवल्यामुळे ब्लॉगरला चांगलंच सुनावलं आहे.  पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा व्हिडीओ आहे. 

एका युजरनं हार्पीक भी डाल देते अशी विनोदी कमेंट केली आहे तर आणखी एकानं हे दूध बिस्किट्स खाण्यासारखं असल्याचं म्हटलंय.  खाण्याच्या गोष्टींवर असे प्रयोग करत जाऊ नका अशी कमेंट एका युजरनं दिली आहे. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स