भाज्यांमध्ये बटाटा फार फेमस आहे (Food). बटाट्याचे अनेक पदार्थ केले जातात. बटाटा कोणत्याही भाजीमध्ये फिट बसतो. कोणत्या भाजीमध्ये बटाटा घातल्यास भाजीची चव वाढते (Potatoes). बटाट्याचा पराठाही आपण खाल्ला असेल. पण आपण कधी आंबट बटाटा खाऊन पाहिला आहे का?
आंबट बटाटा ही गोव्यातली फेमस रेसिपी आहे. जर आपल्या घरात बटाटा असेल तर, आंबट बटाट्याची भाजी करून पाहा. आंबट बटाटा ही रेसिपी अगदी काही मिनिटात तयार होईल. शिवाय ही भाजी भात आणि पोळीसोबत चविष्ट राहील(Batata ambat | easy potato curry).
आंबट बटाटा करण्यासाठी लागणारं साहित्य
बटाटे
तेल
मोहरी
मेथी दाणे
हिंग
हळद
लाल तिखट
चिंच
पाणी
खोबरं
काळी मिरी
कृती
सर्वात आधी कढईत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, एक चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा हिंग आणि बटाट्याचे स्लाईज घालून परतवून घ्या.
बटाटा लालसर झाल्यानंतर त्यात चिमूटभर हळद, लाल तिखट घालून मिक्स करा. एका वाटीमध्ये चिंच आणि पाणी घाला. त्यात चिंचेचं पाणी परतलेल्या बटाट्यामध्ये घालून मिक्स करा. शेवटी चवीनुसार मीठ घालून त्यावर झाकण ठेवा. आणि गॅस मध्यम आचेवर ठेवा.
दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात एक वाटी किसलेलं खोबरं, ५ ते ६ काळी मिरी, एक चमचा धणे, एक हिरवी मिरची आणि थोडं पाणी घालून वाटून घ्या. तयार खोबऱ्याची पेस्ट बटाट्यामध्ये घालून मिक्स करा. शेवटी चमचाभर साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभरून डिश सर्व्ह करा.