Join us  

गावरान पद्धतीने घरीच करा झणझणीत बटाट्याचे भरीत, चव अशी की म्हणाल क्या बात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2023 1:14 PM

Batata bharit recipe। dry potato Sabzi । aloo bharta भाकरी - बुक्कीने फोडलेला कांदा, व बटाट्याच्या भरतासह आखा गावरान झणझणीत बेत

भरीत म्हटलं की, आपल्याला वांग्याचं भरीत आठवतं. झणझणीत चवीचं भरीत प्रत्येकाला आवडते. मार्केटमध्ये गोल - काटेरी वांगी दिसली की, आपण वांग्याच्या भरताचा बेत आखतोच. या बेताच्या तोडीस तोड आणखी एक बेत आपल्याला आखता येईल. घरी वांगी नसेल, आणि भरीत खायची इच्छा झाली असेल तर, बटाट्याचे भरीत ही रेसिपी ट्राय करा.

बटाटा बाराही महिने आपल्या घरात उपलब्ध असते. बटाट्याचे भरीत चपाती, भाकरी किंवा भातासह देखील अप्रतिम लागते. रोजची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, बटाट्याचे भरीत ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. फक्कड चवीची ही रेसिपी पाहून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल(Batata bharit recipe। dry potato Sabzi । aloo bharta).

बटाट्याचे भरीत करण्यासाठी लागणारं साहित्य

उकडलेले बटाटे

हिरव्या मिरच्या

कडीपत्ता

तेल

मोहरी

जिरं

आपल्या माणसांसाठी प्रेमाने करा मोहब्बत - ए - शरबत, रिफ्रेशिंग ज्यूस - उन्हाचा त्रास करेल छुमंतर

हिंग

बारीक चिरलेला कांदा

हळद

मीठ

कोथिंबीर

कृती

बटाटयाचं भरीत करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. सर्वप्रथम, बटाटे उकडून घ्या. व वांग्याला ज्याप्रमाणे आपण भाजून घेतो, त्याच प्रमाणे बटाटे शेगडीवर भाजून घ्या. बटाट्याचा रंग सोनेरी - ब्राऊन होत नाही, तोपर्यंत उकडलेले बटाटे भाजून घ्या.

आता मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, कडीपत्ता घालून मिश्रण जाडसर वाटून घ्या. ज्याप्रमाणे ठेचा आपण तयार करतो, त्याचप्रमाणे मिश्रण वाटून घ्यायचं आहे.

हॉटेलसारखा गोलगरगरीत छिद्र असलेला मेदूवडा करायचाय? १ पळी फक्त हवी, सॉफ्ट-हलका मेदूवडा तयार

दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरं, हिंग, बारीक चिरलेला कांदा घालून साहित्य भाजून घ्या. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या. त्यात मिरचीचा ठेचा घालून मिश्रणात मिक्स करा.

आता त्यात हळद, चवीनुसार मीठ, उकडून भाजून घेतलेले बटाटे कुस्कुरून मिश्रणात मिक्स करा. सर्व साहित्य एकजीव करा. शेवटी कोथिंबीर पसरवा. अशा प्रकारे झणझणीत बटाट्याचे भरीत खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स