उन्हाळा सुरु होताच महिलावर्ग वाळवणाच्या तयारीला लागतात. पापड, कुरड्या, सांडगे, पळी पापड यासह बटाटा चकली हमखास केली जाते. पण आपण कधी साबुदाणा बटाटा पापड खाऊन पाहिलं आहे का? बटाटा उकडून आणि त्यात साबुदाण्याचे पीठ मिक्स करून तिखट, खारट असे चवदार पापड तयार करण्यात येते (Batata Papad). शिवाय कमी साहित्यात कमी वेळात हे पापड तयार होतात (Cooking Tips).
काही वेळेला पळी पापड करताना साहित्यांमध्ये गडबड होते. किंवा इतर पापड लाटताना फाटतात (Papad Recipe). जर आपल्याला पापड तयार करताना झंझट नको असेल तर, एकदा साबुदाणा बटाट्याचे पापड करून पाहा. उन्हात न वाळवता कमी खर्चात-कमी वेळात झटपट पापड तयार होतील(Batata Papad Recipe-Check Out Easy Recipe).
साबुदाणा बटाट्याचे पापड करण्यासाठी लागणारं साहित्य
उकडलेले बटाटे
साबुदाण्याचे पीठ
लाल तिखट
जिरे
विकतसारखे दही घरात तयार होते? एक जबरदस्त टीप; पाणी न सुटता - गोडसर दही होईल तयार..
मीठ
तेल
कृती
सर्वप्रथम, एका परातीमध्ये २ मोठे उकडलेले बटाटे किसून घ्या. किसलेल्या बटाट्यामध्ये एक कप साबुदाण्याचे पीठ घाला. नंतर त्यात एक चमचा लाल तिखट, एक चमचा जिरे, चवीनुसार मीठ घाला, व हाताला थोडे तेल लावून साहित्य एकजीव करा, व गोळा तयार करून घ्या. जर पीठ सैल झाले असेल तर, त्यात आणखीन साबुदाण्याचे पीठ घालून मिक्स करा.
आयर्न-प्रोटीनने परिपूर्ण ग्रीन-ढोकळा कधी खाल्लाय का? कपभर हिरव्या मुगाची टेस्टी-हेल्दी रेसिपी..
आता २ प्लास्टिक पेपर घ्या. पेपरला हाताने तेल लावा. एक प्लास्टिकचा पेपर उलट्या ताटावर ठेवा. त्यावर छोटा गोळा घेऊन ठेवा. दुसरे प्लास्टिकचे पेपर गोळ्यावर ठेऊन दुसऱ्या प्लेटने गोळ्यावर हलके दाब द्या. अशा प्रकारे न लाटता पापड तयार होतील. दुसरीकडे फॅनखाली प्लास्टिक पेपर अंथरून ठेवा. त्यावर पापड सुटसुटीत वाळत घाला. किंवा कडकडीत उन्हातही आपण पापड वाळत घालू शकता.
२ ते ३ दिवसात पापड वाळत घातल्यानंतर हवाबंद डब्यात साठवून ठेवा. हे पापड महिनाभर आरामात टिकतात. जेव्हा इच्छा होईल, तेव्हा गरम तेलात तळून दुप्पट फुलणाऱ्या चविष्ट पापडाचा आनंद घ्या.