Join us  

करा बटाट्याचा रस्सा, म्हणाल अशी गावरान ठसक्याची झणझणीत भाजी कधी खाल्ली नव्हती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2023 1:38 PM

Batata rassa bhaji recipe | Maharashtrian Recipe रोज भाजीला काय करु असा प्रश्न असतोच, करुन पाहा हा बटाट्याचा चविष्ट रस्सा

बटाटा म्हटलं की प्रत्येक डिशमध्ये फिट होणारी भाजी. बटाट्याचे अनेक प्रकार केले जातात. बटाट्याची भाजी, भजी, पराठे, वडे, समोसे हे पदार्थ फार फेमस आहेत. पुरीसोबत असणारी बटाट्याची भाजी तर आपण खाल्लीच असेल. परंतु, याच बटाट्याला आपण कधी लाल तिखटाचा ट्विस्ट देऊन पाहिलं आहे का?

दुपारच्या जेवणाला घरात भाजी नसेल किंवा, रोजची तिच तिच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, बटाट्याची झणझणीत रस्सा भाजी ट्राय करून पाहा. ही रेसिपी चवीला तर झणझणीत लागतेच, व कमी साहित्यात झटपट तयार होते. ही तर्रीदार रेसिपी भाकरी, चपाती, भातासोबत भन्नाट लागते. चला तर मग जिभेची चव वाढवणाऱ्या या पदार्थाची कृती पाहूयात(Batata rassa bhaji recipe | Maharashtrian Recipe).

झणझणीत बटाट्याची रस्सा भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य

बटाटे

सुखं खोबरं

लसूण

कोथिंबीर

साखर-तूप-गुळ न घालता करा प्रोटीन लाडू, केस गळणे-थकवा-स्किन प्रॉब्लम्स होतील कमी

तेल

मोहरी

जिरं

हिंग

कडीपत्ता

कांदा

लाल तिखट

हळद

कांदा - लसूण मसाला

मीठ

कृती

सर्वप्रथम, २ ते ३ बटाट्यांचे चौकोनी काप करा, व पाण्यात बटाटे स्वच्छ धुवून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात २ टेबलस्पून किसलेलं सुखं खोबरं, १० ते १२ लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर घालून पेस्ट तयार करा. कढईत ३ टेबलस्पून तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्यात एक टेबलस्पून मोहरी, एक टेबलस्पून जिरं, अर्धा चमचा हिंग, ५ ते ६ कडीपत्त्याची पानं, व तयार पेस्ट घालून भाजून घ्या. त्यानंतर २ बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

घरी ढाबास्टाईल डाळ - खिचडी करता येत नाही? कुकरमध्ये द्या फोडणी, ढाब्यावरची चव येईल नक्की

कांदा भाजल्यानंतर त्यात एक टेबलस्पून लाल तिखट, अर्धा चमचा हळद, २ टेबलस्पून कांदा - लसूण मसाला व चवीनुसार मीठ घाला. साहित्य मिक्स केल्यानंतर त्यात बटाटे घालून मिक्स करा. २ मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवून वाफेवर बटाटे शिजवून घ्या. २ मिनिटानंतर त्यात २ कप पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चिरलेली कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे झणझणीत बटाट्याची रस्सा भाजी खाण्यासाठी रेडी.

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स