Join us  

मस्त फुलणारे साबुदाणा बटाटा पापड घरीच करा; ही घ्या कुरकुरीत, खमंग पापड रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 2:43 PM

Batata Sabudana papad : साबुदाणा बटाट्याचे पापड खायला कुरकुरीत आणि बनवयाला अगदी सोपे असतात. यासाठी तुम्हाला जास्त सामानही वापरावं लागत नाही.

उन्हाळा सुरू झाल्यानंतर  प्रत्येक घरात सांडगे, पापड, कुरडया बनवायला सुरूवात होते. वर्षभराचे पापड तयार करण्यासाठी उन्हाळा हा उत्तम ऋतू आहे. कडक सुर्यप्रकाशात पापड सुकवून ते वर्षभर वापरात आणले जातात. साबुदाणा बटाटा प्रत्येक उपवासाच्या पदार्थात वापरला जातो. (Farali Aloo Sabudana Papad (Potato Sago Papadum)

साबुदाणा बटाट्याचे पापड खायला कुरकुरीत आणि बनवयाला अगदी सोपे असतात. यासाठी तुम्हाला जास्त सामानही वापरावं लागत नाही. मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी, जेवताना खाण्यासाठी किंवा उपवासाला फराळ म्हणून हा पदार्थ खाऊ शकता. साबुदाणा बटाट्याचे पापड खुसखुशित पापड करण्याची परफेक्ट पद्धत पाहूया. (How to make sabudana batata papad)

पापड बनवण्यासाठी १ कप साबुदाणे पाण्यात भिजवून ठेवा. त्यात बटाटा किसून घाला आणि गरजेनुसार साधारण ७ कप पाणी घाला. त्यात जीरं घाला. हे मिश्रण गॅस ठेवून घट्ट होईपर्यंत व्यवस्थित ढवळून घ्या. एका प्लास्टीकच्य कागदावर  वरणाच्या चमच्याचा वापर करून हे पापड घाला १ ते २ दिवस कडक उन्हात सुकवा. पापड सुकवल्यानंतर एका हवाबंद डब्यात भरा आणि आपल्या आवडीनुसार हवे तेव्हा तळून घ्या.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स