उन्हाळा सुरु झाल्यावर दहीचा वापर अनेक पदार्थांमध्ये होतो. लस्सी, ताक, ताकाची कढी, व रायता हे पदार्थ बऱ्या प्रमाणावर खाल्ले जातात. रायता हा पदार्थ अनेक साहित्यांचा वापर करून बनवला जातो. जेवणामध्ये रायता नसल्यास जेवण पूर्ण वाटत नाही. जास्त करून आपण दह्याचे रायते खातो. बीटरूट व दही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
त्यातील फायबर, फोलेट, मॅंगनीज, लोह आणि व्हिटॅमिन सी शरीराला पौष्टीक घटक देतात. बीटरूट रक्तदाब पातळी कमी करण्यासाठी तसेच रक्त प्रवाह सुधारण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे कार्य करते. आज आपण याच बीटरूट आणि दह्याचा वापर करून रायता बनवणार आहोत. चला तर मग या पौष्टीक पदार्थाची कृती पाहूयात(Beetroot Benefit: Make Beetroot Raita at Home with Less Ingredients).
बीटरूट रायता बनवण्यासाठी लागणारं साहित्य
बारीक किसलेले बीटरूट
लाल तिखट
चवीनुसार मीठ
भाजलेले जिरे पावडर
३ कप दही
गार्निशिंगसाठी पुदिन्याची पाने
भाजी किंवा पदार्थात चुकून तेल जास्त पडले? ते कसे कमी करणार?- ४ टिप्स
बीटरूट रायता बनवण्याची कृती
सर्वप्रथम, एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा. त्या पाण्यात बीटरूट शिजत ठेवा. बीटरूट शिजवून घेतल्यानंतर, त्याची साल काढून त्याचा किस करून घ्या.यानंतर एका मिक्सिंग बाऊलमध्ये दही घ्या. त्यात भाजलेले जिरे पूड, लाल तिखट आणि मीठ घाला. दही गुळगुळीत होईपर्यंत आणि मसाले एकत्र होईपर्यंत साहित्य चांगले फेटून घ्या.
तुम्हाला जीवापाड आवडणारे ६ पदार्थ मूळचे भारतीय नाहीत, ठेवाल विश्वास? पाहा फोटो..
आता दह्यात किसलेला बीटरूट घाला व मिक्स करा. अशा प्रकारे, दह्याचा रंग गुलाबी होताना दिसेल. आता हे मिश्रण थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर त्यावर पुदिन्याची पाने घालून सजवा, अशाप्रकारे बीटरूट रायता खाण्यासाठी रेडी.