Join us

चिरण्यापूर्वी की चिरल्यानंतर, पालक नक्की कधी धुणं योग्य? पालेभाज्या धुण्याची पाहा ‘ही’ ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:38 IST

Spinach Cleaning Tips : लोक पालकसारखी भाजी कापल्यानंतर धुतात आणि अनेकदा यात कचरा किंवा माती तशीच राहते. अशात काय करावं हे जाणून घेऊ.

Spinach Cleaning Tips : हिवाळ्यात वेगवेगळ्या पालेभाज्या भरपूर खाल्ल्या जातात. यात पालक सगळ्यात पौष्टिक आणि फायदेशीर भाजी मानली जाते. या दिवसात मेथी, पालक, चवळी अशा वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीनं खाल्ल्या जातात. भाज्या खाण्याआधी चांगल्या धुवून घेणं फार गरजेचं असतं. अशात भाजी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे. अनेक एक कॉमन चूक अशी बघितली जाते की, लोक पालकसारखी भाजी कापल्यानंतर धुतात आणि अनेकदा यात कचरा किंवा माती तशीच राहते. अशात काय करावं हे जाणून घेऊ.

कापल्यावर की कापण्याआधी, पालक कधी धुवावी?

पालक धुण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे पालक कापण्याआधी धुवावी. पानांमध्ये छोट्या अळ्या किंवा कीटक चिकटून असतात. त्यामुळे पालक आधीच पाण्यात चांगली धुवून घ्यावी. यासाठी मुळं कापून पानं वेगळी करा. ही पानं धुवा आणि काही वेळ सुकू द्या. त्यानंतर कापावी.

न धुता कापली तर काय?

जर पालक तुम्ही न धुता कशी कापली तर एखाद्या जाळीच्या पन्नीत किंवा जाळीच्या चाळणीत ठेवून साफ करा. असं केल्यानं पालक चांगली साफ करू शकाल. त्याशिवाय पालक दोन ते तीन पाण्यात धुवावी. असं केल्यास पानं चांगली आणि सहजपणे स्वच्छ होतील.

पालेभाज्या गरम पाण्यात साफ करा

वेगळी काढलेली पानं साफ करण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे गरम पाण्यात थोडं मीठ टाका आणि त्यात पानं टाकून स्वच्छ करा. यानं पानांना चिकटलेल्या अळ्या किंवा कीटक सहजपणे निघून जातील. नंतर ही पानं कापून त्यांची भाजी बनवू शकता. 

टॅग्स :अन्नस्वच्छता टिप्स