Lokmat Sakhi >Food > लसूण खाण्याचे हे फायदे जाणून घ्याल, तर दररोज न विसरता लसूण खाल...

लसूण खाण्याचे हे फायदे जाणून घ्याल, तर दररोज न विसरता लसूण खाल...

कोणत्याही पदार्थाला तर लसणाची खमंग फोडणी घातली तर त्यामुळे पदार्थाची चव तर निश्चितच वाढते, पण त्यासोबतच आरोग्यासाठीही ते अधिक पोषक ठरते. म्हणूनच आपल्या शरीरासाठी नॅचरल स्क्रबर म्हणून काम करणारा लसूण दररोज खाल्ला पाहिजे, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 05:44 PM2021-06-21T17:44:36+5:302021-06-22T10:49:05+5:30

कोणत्याही पदार्थाला तर लसणाची खमंग फोडणी घातली तर त्यामुळे पदार्थाची चव तर निश्चितच वाढते, पण त्यासोबतच आरोग्यासाठीही ते अधिक पोषक ठरते. म्हणूनच आपल्या शरीरासाठी नॅचरल स्क्रबर म्हणून काम करणारा लसूण दररोज खाल्ला पाहिजे, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे.

Benefits of eating Garlic for health, garlic helps to control many diseases | लसूण खाण्याचे हे फायदे जाणून घ्याल, तर दररोज न विसरता लसूण खाल...

लसूण खाण्याचे हे फायदे जाणून घ्याल, तर दररोज न विसरता लसूण खाल...

Highlightsएखाद्याची भूक मंदावली असेल तर लसूणाच्या २- ३ कच्च्या पाकळ्या रिकाम्या पोटी खाव्या आणि त्यानंतर एखादा ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे पचन क्रिया सुधारते आणि भूक लागते.वजन कमी करणे ही जशी समस्या आहेत, तसेच एखाद्याचे वजन कितीही प्रयत्न करून न वाढणे हे देखील त्रासदायकच असते. म्हणूनच ज्यांना वजन वाढवायचे आहे, त्यांनीही आहारात लसूण अवश्य खावा.

लसणाचा उग्र वास अनेकांना आवडत नाही. त्यामुळे लसूण खाण्याचे टाळले जाते. पण कमी प्रमाणात का होईना पण आरोग्यासाठी दररोज लसूण खाणे उत्तम असते. कच्चा लसून खावा, असेही आहारतज्ज्ञ सांगतात. पण कच्चा लसूण अधिक तिखट आणि उग्र वासाचा असतो. त्यामुळे फोडणीत किंवा एखाद्या पदार्थात टाकून जरी लसणाचे सेवन केले तरी चालू शकते. लसूण योग्य प्रमाणात खाल्ला तर तो आपल्या शरीराची चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारते. चयापचय क्रिया सुधारली तर खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन होते आणि फॅट मध्ये रूपांतर होण्याची क्रिया मंदावते. यामुळे शरीर सुडौल राहण्यास मदत हाेते. यासोबतच नियमितपणे लसूण खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

 

१. लसूण आहे नॅचरल ॲण्टीबायोटीक
ज्याप्रमाणे शरीर आतून स्वच्छ करणारे नॅचरल स्क्रबर म्हणून लसूण ओळखला जातो, त्याचप्रमाणे नॅचरल ॲण्टीबायोटीक म्हणूनही लसणाकडे पाहिले जाते. सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या पाकळ्या चावून खाणे हे शरीरातील कोणतेही इन्फेक्शन कमी करण्यास मदत करते. 

२. हृदयविकाराचा धोका कमी होतो
लसूण हा उष्ण पदार्थ आहे. नियमितपणे जर लसूण खाल्ला तर रक्ताच्या गाठी होण्याची क्रिया मंदावते. रक्ताभिसरण सुरळीत होते. त्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो आणि हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे ज्यांना हृदयविकार आहे, रक्तदाबाचा त्रास आहे, अशा व्यक्तींनी दररोज लसूणाच्या पाकळ्या खाव्यात असे आहारतज्ज्ञ सांगतात. 

 

३. श्वसनाच्या आजारांवर लसूण ठरतो गुणकारी
उष्ण असल्यामुळे सर्दी, खोकला, दमा या आजारांमध्ये लसूण खाणे उत्तम असते. कोरोना काळातही लसूणाचा उपयोग अनेक जणांनी केला आहे. सर्दी किंवा खोकला असल्यास कच्चा लसूण आणि गुळ यांचे चाटण देणे उपयुक्त ठरते. टीबी झालेल्या रूग्णाला देखील लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.

४. कॉलेस्टरॉल नियंत्रणात राहते
लसूण खाण्याने शरीराला अ, ब आणि क जीवनसत्व मिळते. तसेच आयोडीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह हे घटक देखील मुबलब प्रमाणात मिळतात. त्यामुळे कॉलेस्टरॉल नियंत्रणात राहते. तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

 

५. मधुमेहींसाठी ठरतो गुणकारी
नियमितपणे लसूण खाल्ल्याने रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहींनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज कच्च्या किंवा भाजीतून व इतर पदार्थांच्या माध्यमातून लसणाचे सेवन अवश्य करावे. 

Web Title: Benefits of eating Garlic for health, garlic helps to control many diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.