लसणाचा उग्र वास अनेकांना आवडत नाही. त्यामुळे लसूण खाण्याचे टाळले जाते. पण कमी प्रमाणात का होईना पण आरोग्यासाठी दररोज लसूण खाणे उत्तम असते. कच्चा लसून खावा, असेही आहारतज्ज्ञ सांगतात. पण कच्चा लसूण अधिक तिखट आणि उग्र वासाचा असतो. त्यामुळे फोडणीत किंवा एखाद्या पदार्थात टाकून जरी लसणाचे सेवन केले तरी चालू शकते. लसूण योग्य प्रमाणात खाल्ला तर तो आपल्या शरीराची चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारते. चयापचय क्रिया सुधारली तर खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन होते आणि फॅट मध्ये रूपांतर होण्याची क्रिया मंदावते. यामुळे शरीर सुडौल राहण्यास मदत हाेते. यासोबतच नियमितपणे लसूण खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
१. लसूण आहे नॅचरल ॲण्टीबायोटीकज्याप्रमाणे शरीर आतून स्वच्छ करणारे नॅचरल स्क्रबर म्हणून लसूण ओळखला जातो, त्याचप्रमाणे नॅचरल ॲण्टीबायोटीक म्हणूनही लसणाकडे पाहिले जाते. सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या पाकळ्या चावून खाणे हे शरीरातील कोणतेही इन्फेक्शन कमी करण्यास मदत करते.
२. हृदयविकाराचा धोका कमी होतोलसूण हा उष्ण पदार्थ आहे. नियमितपणे जर लसूण खाल्ला तर रक्ताच्या गाठी होण्याची क्रिया मंदावते. रक्ताभिसरण सुरळीत होते. त्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो आणि हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे ज्यांना हृदयविकार आहे, रक्तदाबाचा त्रास आहे, अशा व्यक्तींनी दररोज लसूणाच्या पाकळ्या खाव्यात असे आहारतज्ज्ञ सांगतात.
३. श्वसनाच्या आजारांवर लसूण ठरतो गुणकारीउष्ण असल्यामुळे सर्दी, खोकला, दमा या आजारांमध्ये लसूण खाणे उत्तम असते. कोरोना काळातही लसूणाचा उपयोग अनेक जणांनी केला आहे. सर्दी किंवा खोकला असल्यास कच्चा लसूण आणि गुळ यांचे चाटण देणे उपयुक्त ठरते. टीबी झालेल्या रूग्णाला देखील लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.
४. कॉलेस्टरॉल नियंत्रणात राहतेलसूण खाण्याने शरीराला अ, ब आणि क जीवनसत्व मिळते. तसेच आयोडीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह हे घटक देखील मुबलब प्रमाणात मिळतात. त्यामुळे कॉलेस्टरॉल नियंत्रणात राहते. तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
५. मधुमेहींसाठी ठरतो गुणकारीनियमितपणे लसूण खाल्ल्याने रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहींनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज कच्च्या किंवा भाजीतून व इतर पदार्थांच्या माध्यमातून लसणाचे सेवन अवश्य करावे.